25 candidates in the fray for eleven seats for the Board of Directors of Katraj Dairy 
मुख्य बातम्या

`कात्रज डेअरी`च्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी अकरा जागांसाठी २५ उमेदवार आखाड्यात

पुणे ः जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (कात्रज डेअरी) संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी छाननीत ९१ उमेदवारांचे १०० उमेदवारी अर्ज वैध ठरले होते. या ९१ पैकी अर्ज माघारी घेण्याच्या मुदतीत ६६ उमेदवारांनी माघार घेतली आहे.

टीम अॅग्रोवन

पुणे ः जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (कात्रज डेअरी) संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी छाननीत ९१ उमेदवारांचे १०० उमेदवारी अर्ज वैध ठरले होते. या ९१ पैकी अर्ज माघारी घेण्याच्या मुदतीत ६६ उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे एकूण ५ जण बिनविरोध झाले. उर्वरित ११ जागांसाठी २५ उमेदवार निवडणूक आखाड्यात उतरले आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी दूध संघात कॉंग्रेस राष्ट्रवादीची युती आहे. शिवसेनेला मात्र एकाकी झुंज द्यावी लागणार आहे. 

जिल्हा दूध संघाच्या संचालक मंडळाच्या एकूण १६ जागा आहेत. यापैकी अर्ज माघारीच्या मुदतीत पाच जागा बिनविरोध झाल्या आहेत. माघारी नंतर रिंगणातील सर्व उमेदवारांना बुधवारी (ता. ९) निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे गुरुवारपासून (ता. १०) जिल्ह्यात या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. येत्या २० मार्चला मतदान होईल. बिनविरोध झालेल्यांमध्ये चार तालुकास्तरीय मतदारसंघ, अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातील एका उमेदवाराचा समावेश आहे. अर्ज माघारीची मुदत मंगळवारपर्यंत (ता.८) होती. 

मतदारसंघनिहाय निवडणूक रिंगणातील उमेदवार 

  आंबेगाव ः विष्णू हिंगे विरुद्ध अरुण गिरे    खेड ः चंद्रशेखर शेटे विरुद्ध अरुण चांभारे   जुन्नर ः बाळासाहेब खिलारी विरुद्ध देवेंद्र खिलारी   मुळशी ः रामचंद्र ठोंबरे विरुद्ध कालिदास गोपालघरे    शिरूर ः स्वप्नील ढमढेरे विरुद्ध योगेश देशमुख    भोर ः दिलीप थोपटे, अशोक थोपटे आणि दीपक भेलके.    मावळ ः बाळासाहेब नेवाळे, लक्ष्मण ठाकर, सुनंदा कचरे.    महिला राखीव ः केशरबाई पवार, लता गोपाळे, रोहिणी थोरात आणि संध्या फापाळे.    ओबीसी राखीव ः अरुण गिरे, भाऊ देवाडे, वरुण भुजबळ.    विमुक्त जाती, भटक्या जमाती ः निखिल तांबे, प्रदीप पिंगट.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT