राज्यातील २२० बाजार समित्यांचे कामकाज सुरळीतः सुनिल पवार
राज्यातील २२० बाजार समित्यांचे कामकाज सुरळीतः सुनिल पवार 
मुख्य बातम्या

राज्यातील २२० बाजार समित्यांचे कामकाज सुरळीतः सुनिल पवार

टीम अॅग्रोवन

पुणे: कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये राज्यातील फळे भाजीपाल्याचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी राज्यातील ३०७ बाजार समित्यांपैकी २२० बाजार समित्यांमधून कामकाज सुरु असून, कमीत कमी गर्दीमध्ये बाजार सुरु ठेवण्याचे व्यवस्थापन केले आहे, अशी माहिती पणन संचालक सुनील पवार यांनी दिली. 

याबाबत पवार म्हणाले, ‘‘लॉकडाऊनमध्ये राज्यातील फळे भाजीपाल्याची विस्कळीत झालेली पुरवठा साखळी पूर्ववत झाली आहे. यासाठी पणन, कृषी आणि पोलीस प्रशासनाच्या समन्वयाने काम सुरु झाले आहे. बाजार समित्यांमधून तसेच थेट पणनद्वारे भाजीपाला पुरवठा सुरळीत झाला आहे. यासाठी पुणे, नाशिक आणि मुंबई महानगरपालिकांनी देखील पुढाकार घेतला असून, शहरांमध्ये विविध ठिकाणी भाजीपाला विक्री केंद्रे शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी गटांद्वारे सुरु केला आहे. तर अनेक गटांनी विविध गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये थेट विक्री सुरु केली आहे. या विविध उपाययोजनांमधून शहरांमधील पुरवठा साखळी पूर्ववत झाली आहे. यामुळे ग्राहकांनी फळे भाजीपाला किराणा मिळणार नाही, अशी विनाकारण भिती बाळगू नये व या वस्तूंचा साठा करु नये.’’

परवान्याचा सकारात्मक उपयोग करा बाजार समित्या सुरु करण्यासाठी केंद्र सरकारने साथ रोग पसरू नये यासाठीच्या विविध १२ उपाय आणि खबरदारी घेण्याचे सांगितले आहे. त्यानुसार बाजार समित्यांचे कामकाज सुरु आहे. याची जबाबदारी जिल्हा उपनिबंधकांवर देण्यात आलेली आहे. तसेच थेट पणन परवानाधारकांनी देखील आपल्याला दिलेल्या परवान्याचा सकारात्मक उपयोग सध्याच्या आणीबाणीच्या आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये करण्याचे देखील आवाहन श्री. पवार यांनी केले आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT