21% agriculture under paddy cultivation in Ratnagiri district 
मुख्य बातम्या

रत्नागिरी जिल्ह्यात भात लागवडीखाली २१ टक्के शेती

जिल्ह्यात भात लागवडीखाली २१ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक जमीन आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पीक परिस्थिती समाधानकारक आहे,’’ अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक शिवराज घोरपडे यांनी दिली.

टीम अॅग्रोवन

रत्नागिरी : जिल्ह्यात भात लागवडीखाली २१ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक जमीन आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पीक परिस्थिती समाधानकारक आहे,’’ अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक शिवराज घोरपडे यांनी दिली.

भाताबरोबरच नाचणी पीक क्षेत्रामध्ये ११ टक्‍क्‍यांहून अधिक वाढ झाल्याचे घोरपडे यांनी सांगितले. कोरोनामुळे चाकरमान्यांनी गावची वाट धरली. त्यामुळे जिल्ह्यात ६९ हजार हेक्‍टरवर भातशेती होण्याचा अंदाज कृषी विभागाकडून वर्तविण्यात आला होता.

दरवर्षी सरासरी ६५ हजार हेक्‍टरवरती भातशेती केली जाते. यावर्षी या क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे. यंदा जुलै महिन्यामध्ये पाऊस मंदावला होता. पण, ऑगस्टमध्ये पावसाने कसर भरून काढली. २१.१९ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त क्षेत्रात गतवर्षीच्या तुलनेत भात लागवडीखाली क्षेत्र आले आहे. समाधानकारक पावसामुळेही भाताबरोबरच नाचणी पिकाच्या क्षेत्रामध्ये ११ टक्के वाढ झाली आहे.

जोमदार भातशेतीमुळे शेतकरी सुखावला समाधानकारक पावसामुळे भातशेतीही जोमाने आल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. पावसाने हुलकावणी दिल्यामुळे पिकाला रोगांची लागण होण्याची शक्‍यता असते. पाऊस पडला नाही, तर अनेकवेळा किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता असते. किडींचा प्रादुर्भाव झाल्यास उत्पादनात घट होण्याची शक्‍यता आहे. मात्र, सध्यातरी जिल्ह्यात पीक परिस्थिती समाधानकारक असल्याची माहिती घोरपडे यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fruit Crop Insurance GR: फळपीक विम्याच्या 'आंबिया बहार'साठी १२९ कोटी निधी मंजूर, शासन निर्णय जारी

Heavy Rainfall: जळगाव जिल्ह्याला मुसळधार पावसाचा तडाखा

Public Issues: सामान्य जनतेची अडवणूक खपवून घेणार नाही: आमदार सुभाष देशमुख

Maharashtra Rain Forecast: कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात पावसाची शक्यता

Agrowon Podcast: गहू दरात चढ-उतार, सोयाबीन आवकेत वाढ, काकडी दर स्थिर, लिंबू दरात घसरण तर कोथिंबीर दरात बदल

SCROLL FOR NEXT