2 thousand Cusec's discharge continues from ‘Gangapur’  
मुख्य बातम्या

‘गंगापूर’मधून २ हजार क्युसेकचा  विसर्ग सुरू

नाशिक : गंगापूर धरणाचा पाणीसाठा ८० टक्क्यांवर गेला आहे. त्यामुळे या धरणातून गुरुवार (ता. २९) सकाळी १० ला ५०० क्यूसेक विसर्ग करण्यात आला. दुपारी २ वाजता हा विसर्ग २ हजार क्यूसेक इतका सोडण्यात आला.

टीम अॅग्रोवन

नाशिक : गंगापूर धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रात पश्चिम पट्ट्यात पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळे गंगापूर धरणाचा पाणीसाठा ८० टक्क्यांवर गेला आहे. त्यामुळे या धरणातून गुरुवार (ता. २९) सकाळी १० ला ५०० क्यूसेक विसर्ग करण्यात आला. दुपारी २ वाजता हा विसर्ग २ हजार क्यूसेक इतका सोडण्यात आला. तर दुपारनंतर त्यात हळूहळू वाढ करण्यात आली आहे. 

सकाळी १० वाजता ५०० क्यूसेक पाणी सोडल्यानंतर दुपारी ४ वाजेपर्यंत ३ हजार करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. नदी किनारी राहणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनातर्फे देण्यात आला आहे.

जिल्ह्याच्या इतर भागात रिमझिम पाऊस होत आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर, पेठ, सुरगाणा तालुक्यात पावसाची हजेरी कायम आहे. त्यामुळे धरणांमध्ये पाण्याचा येवा कायम आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ होत आहे. त्यामुळे इगतपुरी तालुक्यातील भावली धरण भरल्यानंतर वालदेवी धरणही तुडुंब झाले आहे.

दारणा धरणातून ५५४० क्यूसेक विसर्ग सोडण्यात आला. भावली धरणातून ४६१, वालदेवी म्हणून ६२, तर नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून २६२३ इतका विसर्ग  सुरू आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Peek Pahani: शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं! ई- पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल, सहायकांची नियुक्ती, शासन निर्णय जारी

Farmer Fraud: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा

Pikvima Scam: पीकविमा अर्जासाठी सीएससी चालकांकडून शेतकऱ्यांची लूट

Dairy Farming: नवतंत्रज्ञानातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य

Pik Vima Dharashiv: गतवर्षीच्या खरिपातील पीकविम्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT