16 out of 24 dams in Nashik district
16 out of 24 dams in Nashik district 
मुख्य बातम्या

नाशिक जिल्ह्यातील २४ पैकी १६ धरणे तुडुंब

टीम अॅग्रोवन

नाशिक : सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील धरणसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. ऑगस्ट महिन्यात हाच साठा निम्म्याच्या वर होता. मात्र धरणांच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे ४ धरणे लवकरच भरतील. त्यामुळे जिल्ह्यात १६ धरणे तुडुंब भरली असून, एकूण पाणीसाठा ९५ टक्क्यांवर आला आहे. तर १६ प्रकल्पांतून सध्या विसर्ग सोडण्यात येत आहे. 

जिल्ह्यात मोठे ७ व मध्यम १७ अशा एकूण २४ धरण प्रकल्प आहेत. त्यामधील एकूण संकल्पित उपयुक्त पाणीसाठा ६५६६४ दलघफू आहे. त्यापैकी बुधवार (ता. ६) अखेर धरणांमध्ये ६२३५० दलघफू पाणीसाठा झाला आहे. एकूण २४ प्रकल्पांपैकी १६ धरणे तुडुंब भरली असून, ४ धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. पश्‍चिम भागात पावसामुळे गोदावरी खोरे गंगापूर धरण समूहातील पाणीसाठा १०० टक्क्यांवर आला आहे. 

गंगापूर धरणातून २८५ क्युसेक विसर्ग सुरू आहे. गिरणा खोरे धरण समूहातील पाणीसाठा ९६ टक्क्यांवर आला आहे. सर्वांत मोठे समजले जाणारे १८,५०० दलघफू क्षमतेचे गिरणा तुडुंब झाले आहे. यातून ७,४२८ क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आला आहे. यासह चणकापूर, हरणबारी, केळझर, नाग्यासाक्या धरणे भरल्याने पाचही प्रकल्पांतून विसर्ग सुरू आहे.

जिल्ह्यात इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर, पेठ व सुरगाणा तालुक्यांतील पाणलोट क्षेत्रांत पाऊस जोरदार झाल्यानंतर परिसरातील धरणे भरली. तसेच कळवण, सटाणा तालुक्यातही असेच चित्र राहिले. मात्र दिंडोरी तालुक्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात टप्प्याटप्प्याने होत असलेल्या पावसामुळे धरणसाठ्यात हळूहळू वाढ झाल्याचे दिसून आले. तर सिन्नर तालुक्यातील भोजापूर भागात अद्याप दमदार पाऊस नसल्याने येथील धरणसाठा अद्याप निम्म्यावर आहे. तर इगतपुरी तालुक्यातील मुकणे धरण ७५ टक्के भरले आहे. दिंडोरी तालुक्यातील ओझरखेड धरण ७७ टक्के भरले आहे. 

आतापर्यंत सरासरी ८०६ मिलिमीटर पाऊस  ‘महावेध’च्या माहितीनुसार जिल्ह्यात जून ते सप्टेंबर दरम्यानचे सरासरी पर्जन्यमान ७०७.१ मिलिमीटर इतके आहे. त्यापैकी ६७७.६ मिलिमीटर इतका पाऊस झाला असून त्याची टक्केवारी ९५.८ इतकी आहे. तर चालू महिन्यात जिल्ह्याची सरासरी ८.६ मिलिमीटर असताना आतापर्यंत ३३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे चालू महिन्यातील टक्केवारी ३८३.७ इतकी वर्षे असल्याने होत असलेल्या पावसामुळे दाणादाण उडाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : कोकणात उष्ण, दमट हवामानाचा इशारा

POCRA Scheme : पोकरा प्रकल्पाच्या पहिल्या टप्‍प्याची आवराआवर

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

SCROLL FOR NEXT