जॉइंट ॲग्रेस्कोत १४ वाणांना मान्यता 
मुख्य बातम्या

जॉइंट ॲग्रेस्कोत १४ वाणांना मान्यता

टीम अॅग्रोवन

राहुरी विद्यापीठ, जि. नगर : महात्मा फुले कृषी विद्यापीठात २९ ते ३१ मे या कालावधीत आयोजन करण्यात आलेल्या ४७ व्या संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समिती (जॉइंट ॲग्रेस्को) बैठकीची सांगता शुक्रवारी (ता. ३१) झाली. शेवटच्या दिवशी चारही कृषी विद्यापीठांचे १४ नवीन वाण, १८ नवीन कृषी यंत्रे आणि १४२ तंत्रज्ञान शिफारशींना मान्यता देण्यात आली.

अ) डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली भात ः  बी. एम. ४ (कर्जत शताब्दी) ः मध्यम कालावधी, अधिक उत्पादन देणारा, विशेषतः पोह्यासाठी उपयुक्त वाण. कोकण विभागात लागवडीसाठी प्रसारित. भेंडी ः कोकण भेंडी : अधिक उत्पादन, हळद्या रोगास सहनशील, कोकण विभागात खरीप हंगामातील लागवडीसाठी प्रसारित.

ब) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी रब्बी ज्वारी ः परभणी सुपर मोती (एस.पी.व्ही. २४०७) ः धान्य व कडब्यासाठी मराठवाडा विभागात लागवडीसाठी प्रसारित.

क) डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला मोहरी ः टी. ए.एम.१०८-१ ः विदर्भ विभागासाठी नागपूर संशोधन केंद्राने विकसित केलेला वाण. अधिक उत्पादन, रब्बी हंगामात लागवडीसाठी शिफारस. कापूस ः फुले शुभ्रा (ए. के.एच.-०९-५) ः अमेरिकन कापसाचा वाण, कोरडवाहू क्षेत्रात लागवडीसाठी शिफारस. पमेलो ः एन. आर. सी.सी.पमेलो-५ ः  लालसर गर व अधिक उत्पादन देणारा वाण, विदर्भासाठी प्रसारित.

ड) महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी नाचणी ः फुले कासारी (के.ओ. पी.एन.-९४२) ः  अधिक उत्पादन, महाराष्ट्रात नाचणी लागवड करणाऱ्या भागामध्ये प्रसारित. भुईमूग ः फुले धनी (जे. एल.-१०८५) ः उपट्या प्रकारचा वाण, अधिक उत्पादन देणारा, खरीप हंगामासाठी प्रसारित. ऊस ः फुले ०९०५७ (को.एम. १२०८५) ः  मध्यम कालावधीत पक्व होणारा वाण,  गुळासाठी उपयुक्त, राज्यात सुरू हंगामात लागवडीसाठी प्रसारित. संकरित कापूस ः फुले माही (आर.एच.बी.-११२२) ः जास्त लांब धाग्याचा आंतरजातीय संकरित वाण, राज्यातील बागायती क्षेत्रात लागवडीसाठी प्रसारित. बोर : फुले शबरी ः महाराष्ट्रात लागवडीसाठी प्रसारित. मेथी : फुले कस्तुरी : लालसर पानांच्या कडा व अधिक उत्पादन असणारा वाण. संपूर्ण महाराष्ट्र राज्यात लागवडीसाठी प्रसारित. लायमा बिन : फुले सुवर्ण ः हा वाण अधिक उत्पादन, ताज्या हिरव्या शेंगा, पश्चिम महाराष्ट्रात लागवडीसाठी प्रसारित. निशिगंध : फुले रजत ःडबल प्रकारातील संकरित वाण, एका फुलदांड्यावर ५० ते ६०  फुले, पश्चिम महाराष्ट्रात लागवडीसाठी प्रसारित.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT