शेटफळे, जि. सांगली ः मृग हंगामातील डाळिंबाची अशी फुलगळ झालेली आहे.
शेटफळे, जि. सांगली ः मृग हंगामातील डाळिंबाची अशी फुलगळ झालेली आहे. 
मुख्य बातम्या

डाळिंबावर फुलगळीचा प्रादुर्भाव

Abhijeet Dake

सांगली ः राज्यात मृग हंगामात ८० ते ९० हजार हेक्‍टरवर डाळिंबाचा बहर धरला जातो. मात्र ढगाळ वातावरण तर कधी रिमझिम पाऊस यामुळे डाळिंबाची फुलगळ होत असून, पीक संकटात सापडले आहे. बदलत्या वातावरणामुळे अंदाजे ३० टक्के फुलगळ होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. 

राज्यात दोन हजार हेक्‍टरपेक्षा अधिक डाळिंबाचे क्षेत्र आहे. त्यापैकी अंदाजे ४० ते ४५ टक्के मृग बहरातील डाळिंब पीक घेतले जाते. दुष्काळी पट्ट्यातील डाळिंब उत्पादक हा बहर धरतात. सध्या राज्यात पावसाचा पुन्हा जोर वाढला आहे. मुळात जून महिन्यात काही ठिकाणी डाळिंबाचा मृग बहर धरला आहे, तर काही ठिकाणी पावसाने उशिरा सुरवात केल्याने जुलैमध्ये बहर घेतला आहे. जून महिन्यात ज्या शेतकऱ्यांनी बहर धरला आहे, त्या डाळिंबाचे सेंटिंग चांगले झाले आहे. फळांची वाढदेखील अपेक्षित झाली आहे. मात्र जुलैच्या पहिल्या आठवड्यात मृग बहर घेतला आहे, त्याची फुलगळ होऊ लागली आहे. 

सातत्याने ढगाळ वातावरण असल्याने परागीकरणासाठी मधमाश्या बागेत येत नाहीत. तसेच रिमझिम पावसामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. आर्द्रता कमी-अधिक होऊ लागली आहे. यामुळे फुलगळ होण्यास प्रारंभ झाला आहे. सगल दुसऱ्या वर्षी फुलगळीचा फटका डाळिंब उत्पादकांना बसला आहे. या बदलत्या वातावरणामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.  

प्रतिक्रिया वातावरण बदलत आहे. यामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी संभ्रमात आहेत, पण शेतकऱ्यांनी धीर सोडता कामा नये. डाळिंबाची योग्य काळजी घेण्यासाठी सल्ल्यानुसार कीडनाशके वा अन्य घटकांचा वापर करावा.   - शहाजी जाचक, अध्यक्ष, महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संशोधन संघ, पुणे

आमच्या परिसरात पाणीटंचाई असल्याने पावसाळ्यात मृग हंगामाताली डाळिंबाचे उत्पादन घेतो. मात्र, कमी पाऊस आणि बदतल्या वातावरणामुळे मृग हंगामात दोन वेळा फुलगळ झाली. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलो आहे. - रूपेश गायकवाड, डाळिंब उत्पादक, शेटफळे, ता. आटपाडी  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Technology : कापूस तंत्रज्ञान मिशनचा दुसरा टप्पा राबविणार

Maize Market : मलकापूरमध्ये मक्याला मिळतोय सरासरी २०८० रुपयांचा दर

Summer Sowing : पावणेसात हजार हेक्टरने उन्हाळी पिकांत वाढ

Sugar Season : ब्राझीलच्या साखरेचा हंगाम धडाक्यात सुरू

Farmer Incentive Subsidy : प्रोत्साहन अनुदानासाठी साडेआठ लाख शेतकरी अपात्र

SCROLL FOR NEXT