वाल्मी व जलसंधारण आयुक्त कार्यालयाच्या बैठकीत मार्गदर्शन करताना जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख. 
मुख्य बातम्या

मृद व जलसंधारण आयुक्तालयाच्या बळकटीकरणासाठी प्राधान्याने निर्णय : मंत्री शंकरराव गडाख

औरंगाबाद : मृद व जलसंधारण आयुक्त कार्यालयाच्या बळकटीकरणासाठी प्राधान्याने निर्णय घेण्यात येतील, असे आश्वासन जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दिले.

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : मृद व जलसंधारण आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून भरीव काम होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने येथे पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ इतर अनुषंगिक बाबी उपलब्ध करुन देण्यासाठी अद्ययावत प्रस्ताव सादर करावा.आयुक्तालयाच्या बळकटीकरणासाठी प्राधान्याने निर्णय घेण्यात येतील, असे आश्वासन जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दिले.

जल व भूमी व्यवस्थापनाच्या क्षेत्रात वाल्मी या संस्थेचे योगदान उल्लेखनीय राहिले आहे. त्यापार्श्वभुमीवर या संस्थेला गतवैभव प्राप्त करुन देण्याच्या दृष्टीने सर्वांनी सक्रिय काम करण्याचे निर्देशही श्री.गडाख यांनी दिले.

येथील वाल्मी मृद व जलसंधारण आयुक्त कार्यालय येथे सोमवारी (ता. ३१) आयोजित मृद व जलसंधारण कार्यालय आणि वाल्मी संस्थेच्या आढावा बैठकीत श्री.गडाख बोलत होते. यावेळी मृद व जलसंधारण (मरा)औरंगाबादचे आयुक्त मधुकर आर्दड, अपर आयुक्त विश्वनाथ नाथ, उपायुक्त (प्रशासन) रवींद्र गोटे, अभियांत्रिक शाखा विभागप्रमुख प्रा.डॉ.अविनाश गारुडकर,विज्ञान विद्याशाखा प्रमुख प्रा.डॉ.अजय इंगळे, प्रा.डॉ. दिलीप दुरबुडे, सहाय्यक आयुक्त ( मृद व जलसंधारण) सुहास वाघ, प्रशासकीय अधिकारी अशोक गायकवाड, प्रादेशिक जलसंधारण अधिकारी वसंत गालफाडे, जलसंधारण अधिकारी अमोल राठोड आदी उपस्थित होते.

श्री.गडाख म्हणाले, की ‘वाल्मी’मध्ये शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम ,चर्चासत्रे आणि संशोधन उपक्रमांमध्ये वाढ होणे गरजेचे आहे. येथील पाणी आणि माती प्रयोगशाळेबद्दल शेतक-यांमध्ये विश्वासहर्ता आहे. हे लक्षात घेऊन जास्तीत जास्त संख्येने येथील प्रयोगशाळेतून परिक्षण अहवाल शेतक-यांना उपलब्ध करुन द्यावेत. तसेच, विभागनिहाय येत्या वर्षभराचा प्रशिक्षण आराखडा तयार करुन सादर करावा. शासनस्तरावर त्याच्या अधिक प्रभावी अमंलबजावणीसाठी पाठपुरावा करण्यात येईल. संस्थेच्या विविध मागण्या, रिक्त पदांच्या भरती बाबत शासनस्तरावर प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. यावेळी प्रा.डॉ.राजेश पुराणिक यांनी वाल्मी संस्थेचे तर अमोल राठोड यांनी आयुक्त कार्यालयाच्या कामकाजाचे सादरणीकरण करुन माहिती दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT