आंदोलन करताना शासकीय कर्मचारी
आंदोलन करताना शासकीय कर्मचारी 
मुख्य बातम्या

संपामुळे कृषी आयुक्तालयातील कामे ठप्प

टीम अॅग्रोवन

पुणे  : देशातील विविध कामगार संघटनांनी बुधवारी (ता. ८) पुकारलेल्या संपात कृषी आयुक्तालयातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. यामुळे बहुतेक विभागांमधील कामकाज दिवसभर ठप्प होते. 

कृषी आयुक्तालयाचे काम पुण्यात सेंट्रल बिल्डिंग, साखर संकुल व कृषी भवन अशा तीन ठिकाणांहून चालते. बुधवारी सकाळी दहा वाजेपासूनच कर्मचारी आपल्या जागेवर न जाता प्रवेशद्वाराजवळ जमा झाले. संपातील सहभाग कसा नोंदवायचा, सेंट्रल बिल्डिंग भागात एकत्रित कशी कूच करायची याचे नियोजन त्यांनी केले. 

कृषी आयुक्तालयातील कर्मचाऱ्यांना थंब पंचिंग आहे. अनेक कार्यालयांमध्ये कर्मचारी पंचिंग करून निघून गेल्याचे दिसून आले. कर्मचारी नाहीत अशी संधी पाहून काही विभागांमध्ये वरिष्ठ अधिकारीदेखील दुपारपर्यंत आपल्या कक्षाकडे फिरकले नाहीत.  कृषी आयुक्तालयातील शुकशुकाट.. पहा video..  

कृषी आयुक्त मात्र दिवसभर आपल्या नियोजनात गर्क होते. मराठवाड्यात मुख्यमंत्र्यांनी बोलावल्या बैठकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेणारी बैठकदेखील आयुक्तांनी घेतली. आयुक्तालयाच्या कर्मचारी उपस्थितीची माहिती जमा करण्याचे काम आस्थापना विभागाचे असते. विशेष म्हणजे आस्थापना विभागाचा दूरध्वनी उचलला जात नसल्यामुळे निश्चित किती कर्मचारी संपात सहभागी झाले याची माहिती मिळाली नाही. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

International Labor Day : शेतकऱ्यांकडे माणूस म्हणून कधी पाहणार?

Farmer Issue : लोकशाहीच्या उत्सवात शेतकरी दुर्लक्षितच

Cashew Farming : काजू हंगाम अंतिम टप्प्यात

Agriculture Technology : पर्यावरणपूरक इंधन कांडी, गॅसिफायर तंत्रज्ञान

Agriculture Technology : पेरणी यंत्र, उपकरणांची देखभाल

SCROLL FOR NEXT