संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

जीवनावश्यक बाबींच्या सुरळीत पुरवठ्यासाठी पुण्यात समिती

टीम अॅग्रोवन

पुणे  ः कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व ग्रामीण भागात अन्नधान्य आणि जीवनावश्यक बाबींचा पुरवठा सुरळीत व्हावा आणि अन्नधान्याची साठेबाजी होऊ नये यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. या दोन्ही बाबींसाठी शहरी भागाकरिता अन्नधान्य वितरण अधिकारी तर ग्रामीण भागाकरिता जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.  

या समितीत कृषी अधिकारी, पुणे महानगरपालिकेचे अधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव, पेट्रोल, डिझेल कंपन्यांचे अधिकारी, गॅस वितरण संघटना, भुसार व्यापार संघटनांचे अध्यक्ष आणि सहकार विभागाचे उपनिबंधक यांचा समावेश असणार आहे. ही समिती अन्नधान्य वितरण व्यवस्थित होत असल्याबाबत खात्री करणार आहे.

किराणा दुकाने, रेशन धान्य दुकाने, भाजीपाला विक्रीची ठिकाणे, दूध व वैद्यकीय सेवा देणारी दुकाने, दवाखाने याद्वारे नागरिकांना आवश्यक सुविधा मिळव्यात यादृष्टीने ही समिती काम करणार आहे. नागरिक अनावश्यक कारणांसाठी वाहने, खासगी वाहने, दुचाकीवरून एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात जाऊ नयेत यासाठीही ही समिती नियंत्रण ठेवणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ocean Weather : हिंद महासागरात कायमस्वरूपी सागरी उष्ण लाटांची शक्यता

Bajari Harvesting : उन्हाळी बाजरी काढणीच्या अवस्थेत

Crop Damage : एक लाख हेक्टरवरील पिके नष्ट

Silk Cocoon Market : रेशीम कोष खरेदी बाजारात आवक मंदावली

Summer Weather : विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटा शक्य

SCROLL FOR NEXT