‘कुकडी’तून उन्हाळी आवर्तन सोडावे, या मागणीसाठी माजी मंत्री राम शिंदे यांनी तहसील कार्यालयासमोर कार्यकर्त्यांसमवेत उपोषण केले.
‘कुकडी’तून उन्हाळी आवर्तन सोडावे, या मागणीसाठी माजी मंत्री राम शिंदे यांनी तहसील कार्यालयासमोर कार्यकर्त्यांसमवेत उपोषण केले. 
मुख्य बातम्या

‘कुकडी’च्या आवर्तनाबाबत आमदारांनी दिशाभूल केली : प्रा. राम शिंदे

टीम अॅग्रोवन

 नगर : कर्जत-जामखेडला ‘कुकडी’चे उन्हाळी आवर्तन सोडण्याचे आश्वासन विद्यमान आमदारांनी पाळले नाही. खोटे आश्वासन देऊन त्यांनी जनतेची दिशाभूल केली आहे. फेसबुकवरून जनतेशी संवाद साधणाऱ्या आमदारांनी आवर्तनाबाबतही संवाद साधावा, अशी टीका भाजपचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर केली.

कर्जत येथील तहसील कार्यालयासमोर सोमवारी (ता. १) प्रा. शिंदे यांनी आवर्तनाच्या मागणीसाठी उपोषण केले. या वेळी ते बोलत होते. तहसीलदार नानासाहेब आगळे, ‘कुकडी’चे कार्यकारी अभियंता रामदास जगताप यांच्याशी त्यांनी चर्चा करून निवेदन दिले आहे. या वेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर, तालुकाध्यक्ष डाॅ. सुनील गावडे, उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, अशोक खेडकर उपस्थित होते.

प्रा. राम शिंदे म्हणाले, की नगर जिल्ह्यातील कर्जत, जामखेड तसेच शेजारील करमाळा या तालुक्यांना पाणी मिळावे, यासाठी जानेवारीमध्ये नियोजन केल्याचे सांगण्यात आले होते. विद्यमान आमदारांनी तसे जाहीर केले होते. परंतु उन्हाळ्यातील आवर्तनच गायब झाले. कार्यकारी अभियंत्यांनी सांगितले, की १५ जूनला आवर्तन देऊ शकतो. आम्ही उपोषणाची नोटीस दिल्यानंतर घाईघाईने बैठक झाली. त्यात निर्णय घेतला की ६ तारखेला पाणी देऊ. नंतर मात्र येडगावला पाणीसाठा शिल्लक नसल्याने ६ तारखेला पाणी सोडू शकत नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे. समन्वय आणि निर्णय नसल्यामुळे आम्हाला उपोषणासारखे पर्याय ‘कोरोना’च्या दरम्यान अवलंबावे लागतात. आता अधिकारी लेखी देतो म्हणत आहेत, परंतु प्रत्यक्षात हे आवर्तन १५ तारखेच्या दरम्यान सुटेल, अशी अवस्था आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : केळी विमाधारक वादळात नुकसानीच्या परताव्यांपासून वंचित

Poultry Management : तापमान नियंत्रणासाठी पोल्ट्रीशेडवर कोरडा चारा, पाचट, पाण्याचे फवारे

Drought Update : ‘बाहत्तर’च्या दुष्काळाची आठवण होतेय ताजी

Water Scarcity : पाण्यासाठी महिलांची एक किमी पायपीट

Onion Export : कांदा निर्यातीची खोटी बातमी देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल - अनिल घनवट

SCROLL FOR NEXT