शाश्‍वत टोमॅटो उत्पादनासाठी प्रयत्न 
मुख्य बातम्या

शाश्‍वत टोमॅटो उत्पादनासाठी प्रयत्न

अमेरिकेतील लिपमन फॅमिली फर्म या कंपनीने बाह्य शेतीमध्ये टोमॅटो उत्पादन घेताना वातावरणातील अनेक घटकांचा परिणाम कमीत कमी कसा राहील यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

वृत्तसेवा

हरितगृहातील टोमॅटो आणि बाह्य शेतीतील टोमॅटोच्या यांच्या लागवडीसह उत्पादन पद्धती भिन्न आहेत. त्यामध्ये बाह्य शेतीतील टोमॅटोमध्ये बाह्य वातावरणाचा मोठा परिणाम होतो. उत्पादनामध्ये होणारे चढउतार मर्यादित ठेवून शाश्‍वतता आणण्यासाठी विविध कंपन्या आपापल्या पातळीवर अनेक प्रयत्न करत असतात. अमेरिकेतील लिपमन फॅमिली फर्म या कंपनीने बाह्य शेतीमध्ये वातावरणातील अनेक घटकांचा परिणाम कमीत कमी कसा राहील यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ‘लिपमन फॅमिली फार्म’मध्ये शाश्‍वतता आणि कार्यपद्धती विश्‍लेषक म्हणून कार्यरत लुईस डेमासो यांनी याविषयी अधिक माहिती दिली. त्यांची ही कंपनी हरितगृहासह बाह्य शेतीमध्येही टोमॅटो आणि अन्य भाज्यांचे उत्पादन घेते. या दोन्ही लागवड पद्धतींतील भिन्नता लक्षात घेऊन प्रत्येक टप्प्यावर प्रयत्न केले जात आहेत. बाह्य शेतीमध्ये जल संवर्धन, कीड नियंत्रण कार्यक्रम आणि बियाणे पैदास कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणातील चाचण्या आणि पैदास कार्यक्रम राबवल्या जात आहेत. बाह्य शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज असते. त्याची पूर्तता करण्यासाठी स्वयंचलित ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला. यामध्ये पाण्यामध्ये सुमारे ७० टक्क्यांपर्यंत बचत झाली. ठिबक सिंचन पद्धतीमुळे विद्राव्य खतांचा वापर करणे शक्य झाले.      हरितगृहाच्या तुलनेमध्ये बाह्य शेतीमध्ये कीड-रोगांच्या प्रादुर्भावाची शक्यता अधिक असते. त्यांच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा वापर करण्यावर भर दिला आहे. डेमासो यांनी सांगितले, की कीडनियंत्रणाच्या पद्धतीमध्ये अगदी सर्वेक्षणापासून सुरुवात केली. शेतामध्ये सातत्याने फिरून कीड-रोगाच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवणे, त्याचे वेळीच निदान करणे यावर भर दिला. किडीच्या प्राथमिक अवस्थेतच प्रादुर्भाव लक्षात आल्यास नैसर्गिक आणि जैविक पद्धतींचा अवलंब करता येतो. यामुळे जमीन सुपीकता, पर्यावरण यांच्यासाठीही फायद्याचे राहते. पैदास कार्यक्रम ः लिपमन फॅमिली फार्म हे स्वतः बीजोत्पादन कार्यक्रम राबवतात. त्याची सुरुवात २००४ मध्ये झाली. दरवर्षी कंपनी वेगवेगळ्या ३०० टोमॅटो जातींच्या चाचण्या घेते. त्यातून उत्तमोत्तम अशा संकरित जातींचा विकास करते. त्यातून विविध रोगांना प्रतिकारक, अधिक गोडवा व स्वाद असलेली फळे आणि काढणीनंतर अधिक साठवण काळ अशा गुणधर्मांना प्राधान्य दिले जाते. अमेरिकेमध्ये विविध शेतकऱ्यांसोबत बीजोत्पादनासाठी काम केले जाते. संपूर्ण खंडामध्ये १३ ठिकाणी रिपॅकिंग सुविधा केंद्रे उभारलेली आहेत. यामुळे उत्पादनाचा ताजेपणा टिकवून ठेवण्यासोबत कार्बन फूटप्रिंट कमीत कमी ठेवता येतो. क्लॅमशेल पॅकेजिंग केवळ उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये शाश्वतता आणूनच लिपमन थांबलेली नाही. त्यांनी सहजपणे व संपूर्ण कुजणाऱ्या क्लॅमशेल पॅकेजिंगचा विकास केला आहे. त्यातून त्यांची पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या टोमॅटो आणि द्राक्षांची विक्री केली जाते.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Cultivation Techniques: कापूस उत्पादनवाढीसाठी सघन लागवड पद्धत

Agri Innovation: कृषी उद्योजकांनी ज्ञान, संशोधनाचा विस्तार करावा

Agriculture Crisis: दिल्लीतील घोषणा अन् शिवारातील वेदना

Milk Adulteration Racket: गोरखधंदा भेसळीचा!

Maharashtra Vanshree Award 2024: ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार’ जाहीर

SCROLL FOR NEXT