युरोपातील वणव्यांचा तापमान वाढीशी जोडला संबंध
युरोपातील वणव्यांचा तापमान वाढीशी जोडला संबंध 
मुख्य बातम्या

युरोपातील वणव्यांचा तापमान वाढीशी जोडला संबंध

वृत्तसेवा

मध्य युरोपमधील जंगलात लागणाऱ्या आगीमुळे तापमानामध्ये वाढ होत आहे. त्यावर नियंत्रण आणणे शक्य झाल्यास जागतिक तापमानाची वाढ १.५ अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादीत ठेवणे शक्य असल्याचे बार्सिलोना विद्यापीठातील संशोधनात पुढे आले आहे. हे संशोधन नेचर कम्युनिकेशन्स मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. मध्य युरोपमधील अनेक देशांमध्ये जंगलामध्ये काही ठराविक हंगामामध्ये वणवे लागतात. त्याचे जंगल, त्यातील सजीवांसह पर्यावरणावरही विपरीत परीणाम होतात. बार्सिलोना विद्यापीठातील संशोधक मार्को तुर्को आणि त्यांच्या गटाने केलेल्या या अभ्यासामध्ये सन २०१७ आणि २०१८ मध्ये युरोपातील वणवे लागण्याच्या हंगामामध्ये तापमानात होणाऱ्या वाढीचा अभ्यास करण्यात आला. वणव्यांमुळे होणाऱ्या मानवी, आर्थिक आणि पर्यावरणीय नुकसानीचा अंदाज घेण्यात आला. त्यासाठी विविध प्रादेशिक हवामान आकडेवारी व अंदाजांचा विचार करण्यात आला. यात युरोपमधील काही प्रांत विशेषतः ग्रीस, पोर्तुगाल, स्वीडनमधील मोठ्या वणव्यांचा परिणाम तीव्र दुष्काळ आणि उष्णतेच्या लाटांमध्ये होत असल्याचे दिसून आले.

  • जागतिक तापमानातील १.५ अंश सेल्सिअस या वाढीपैकी सुमारे ४० टक्के वाढ ही वणव्यामुळे होणाऱ्या उष्णता वाढीशी जोडता येते. यात भविष्यात होणाऱ्या वाढीचा विचार करण्यात आलेला नाही. मात्र, भविष्यामध्ये तापमानामध्ये दुप्पटीने वाढ झाल्यास हे प्रमाण १०० टक्क्यापर्यत वाढू शकते.
  • सध्या जंगलाच्या व्यवस्थापनामध्ये मोठ्या वणव्यांच्या सामाजिक आणि आर्थिक बाबींचा अधिक अभ्यास होण्याची आवश्यकता आहे. त्याअनुसार सध्याच्या व्यवस्थापन पद्धतीमध्ये धोरणात्मक बदल होणे गरजेचे असल्याचे संशोधकांचे मत आहे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

    Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

    Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

    Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

    Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

    SCROLL FOR NEXT