वनस्पतीच्या ताण स्थितीतील संदेश यंत्रणा उलगडली  
मुख्य बातम्या

वनस्पतीच्या ताण स्थितीतील संदेश यंत्रणा उलगडली

वृत्तसेवा

वनस्पतीतील ताणाच्या स्थितीमध्ये कार्यरत होणाऱ्या हरितद्रव्य ते केंद्रक या दरम्यान असलेल्या जनुकीय संदेश यंत्रणेविषयी नेमकेपणाने माहिती उपलब्ध करण्यात साल्क प्रयोगशाळेतील संशोधकांना यश आले आहे. या संशोधनामुळे बदलत्या वातावरणामध्ये तग धरणाऱ्या नव्या जातींचा विकास करणे शक्य होणार आहे. हे संशोधन प्रोसिडिंग्ज ऑफ दी नॅशनल अॅकेडमी ऑफ सायन्सेसमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. तीन अंशांनी तापमान वाढले तर जग नेमके कसे दिसेल? वनस्पतींच्या हरितद्रव्यापासून केंद्रकापर्यंत सर्वत्र ताणांचे संदेश पोचवले जातील, या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी जनुकीय पातळीवर नियंत्रणाचे उपाय सुरू झालेले असतील. अशा वेळी कार्यरत होणारे विशेषतः हरितद्रव्यापासून केंद्रकापर्यंत संदेश पोचवणारे जनुक GUN१ साल्क संस्थेतील संशोधकांना आढळले आहे. अशा इजा झालेल्या हरितद्रव्याच्या स्थितीमध्ये प्रथिनांची निर्मिती कशा प्रकारे होणार, यासाठीही ते जनुक महत्त्वाचे ठरते. एकूण वनस्पती ताणाच्या स्थितीला कशी सामोरे जाणार याविषयीची माहिती या जनुकांमुळे मिळते. साल्क संस्थेतील वनस्पती मूलद्रव्यीय आणि पेशीय जीवशास्त्र प्रयोगशाळेचे संचालक व प्रो. जोआर कोरी यांनी सांगितले, की वातावरण बदलाच्या स्थितीमध्ये आपल्या अन्नसाखळीवर लक्षणीयरीत्या परीणाम होण्याची शक्यता दिसून येते. जेव्हा वनस्पती दुष्काळासारख्या ताणाच्या स्थितीमध्ये असते, त्या वेळी ते कमी उत्पादन देतात. जर पिकांचा दुष्काळाला किंवा ताणाला मिळणारा नेमका प्रतिसाद समजू शकला तरी आपण या स्थितीमध्ये तग धरतील, अधिक उत्पादन देतील अशा पद्धती विकसित करू शकतो.

  • वनस्पती पेशीमध्ये क्लोरोपास्ट किंवा हरितद्रव्य ही एक यंत्रणा सूर्याच्या ऊर्जेचे रुपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये करत असते. सामान्यतः पेशीचे केंद्रकाकडून हरितद्रव्याकडून स्थिर ऊर्जा उत्पादनासाठी संदेश पाठवला जातो. मात्र, ताणाच्या स्थितीमध्ये हरितद्रव्याकडून इशारा देणारा संदेश पेशी केंद्रकाकडे पाठवला जातो. या तातडीच्या संदेशामुळे हरितद्रव्यातील नियंत्रक अशा जनुकांना चालना मिळते.
  • या पूर्वीच्या संशोधनामध्ये कोरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी हे काम करणारा जनुकांचा गट ओळखला होता. त्यात GUN१ याचा समावेश होता. हे जनुक वनस्पतीला ताण जाणवत असताना पेशीतील अन्य जनुकांच्या कार्यक्षमतेवर परिणाम करते हे समजले असले तरी ते नेमकेपणाने कसे काम करते, हे माहित नव्हते.
  • ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Sugarcane Payments Pending: ऊस बिले द्या, अन्यथा जलसमाधि

    Farmer Loan Waiver : २०१७ आणि २०१९ च्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी निर्णय

    Drinking Water Storage: तेरा प्रकल्पांतील साठा पिण्यासाठी आरक्षित

    Tur Seeds Procurement: तेलंगणातील शेतकरी तूरीच्या बियाणे खरेदीसाठी करमाळ्यात

    Agrowon Podcast: आल्याचा भाव टिकून; सोयाबीन टिकून, गहू आवक घटली, तर कापूस व कारले स्थिरावले

    SCROLL FOR NEXT