हृदयासाठी आरोग्यवर्धक पदार्थांतून सोया प्रथिने वगळणार
हृदयासाठी आरोग्यवर्धक पदार्थांतून सोया प्रथिने वगळणार 
मुख्य बातम्या

हृदयासाठी आरोग्यवर्धक पदार्थांतून सोया प्रथिने वगळणार

वृत्तसेवा

अमेरिकी अन्न आणि औषध प्रशासनाने हृदयासाठी आरोग्यदायी अन्नांच्या यादीतून सोया प्रथिने काढून टाकण्याचे नियोजन केले आहे. यासाठी सोयाबीन उत्पादनासंबंधी सध्या उपलब्ध असलेल्या ४६ संशोधन चाचण्यांच्या पुनर्विश्लेषणाचा आधार त्यांनी घेतला आहे. मात्र, अनेक संशोधक या धोरणासाठी प्रशासनावर टीका करीत आहेत. टोरॅंटो येथील सेंट मायकेल हॉस्पिटलमधील संशोधनामध्ये सोया प्रथिनांची कोलेस्टेरॉल कमी करण्याची क्षमता कमी तरूही लक्षणीय असल्याचे मांडले होते. अशाच प्रकारे विविध ठिकाणी झालेल्या ४६ संशोधन चाचण्यांपैकी ४३ मधून मिळालेल्या माहिती आणि निष्कर्षांचे पुन्हा विश्लेषण करण्यात आले. यातील ४१ चाचण्यांमध्ये सोया प्रथिनांचे कमी घनतेच्या लोपिप्रोटीन (एलडीएल) कोलेस्टेरॉल (हे वाईट कोलेस्टेरॉल म्हणून ओळखले जाते.) वरील परिणामांचा अभ्यास केला होता. रक्तातील एकूण कोलेस्टेरॉलच्या प्रमाणाविषयीची माहिती या सर्व संशोधनातून मांडण्यात आली आहे. क्लिनिकल न्यूट्रिशन अॅण्ड रिक्स फॅक्टर मॉडिफिकेशन सेंटरचे संचालक डॉ. डेव्हिड जेन्किन्स यांच्या संशोधनानुसार, सोया प्रथिनांमुळे एलडीएल कोलेस्टेरॉलचे प्रमाण प्रौढांमध्ये ३ ते ४ टक्के कमी होते. हे प्रमाण कमी वाटत असले, तरी लक्षणीय आहे. जेव्हा एखादी व्यक्ती त्यांच्या आहारातील अधिक संपृक्त मेद आणि कोलेस्टेरॉलयुक्त मांसाऐवजी सोया प्रथिनांचा वापर करू लागते, त्या वेळी कोलेस्टेरॉलचे प्रमाण लक्षणीय कमी होते. सध्याच्या माहिती आणि आमच्या विश्लेषणानुसार सोया प्रथिने ही हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात. असे असूनही विविध ४६ संशोधनांतील माहिती आणि निष्कर्षानुसार अन्न आणि औषध प्रशासन सोया प्रथिने या यादीतून वगळण्याचा निर्णय घेत आहे. वास्तविक, वनस्पतीजन्य आहार हा एकूणच आरोग्यासाठी चांगला असून, लोक त्याचा वापर सुरू ठेवतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. कॅनडा येथील आरोग्य विभागाने यासाठी तशा मार्गदर्शक सूचनाही प्रसारित केल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

International Labor Day : शेतकऱ्यांकडे माणूस म्हणून कधी पाहणार?

Farmer Issue : लोकशाहीच्या उत्सवात शेतकरी दुर्लक्षितच

Cashew Farming : काजू हंगाम अंतिम टप्प्यात

Agriculture Technology : पर्यावरणपूरक इंधन कांडी, गॅसिफायर तंत्रज्ञान

Agriculture Technology : पेरणी यंत्र, उपकरणांची देखभाल

SCROLL FOR NEXT