भारतीय भूजलामध्ये युरॅनिअमचे प्रदूषणाचे प्रमाण अधिक
भारतीय भूजलामध्ये युरॅनिअमचे प्रदूषणाचे प्रमाण अधिक  
मुख्य बातम्या

भारतीय भूजलामध्ये युरॅनिअमचे प्रदूषणाचे प्रमाण अधिक

वृत्तसेवा

ड्यूक विद्यापीठातील संशोधकांच्या नेतृत्त्वाखाली करण्यात आलेल्या अभ्यासामध्ये भारतातील भूजलामध्ये युरॅनिअमचे प्रदूषण अतिदूरपर्यंत पसरले असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. यामध्ये भारतामधील सोळा राज्यांतील भूजलाचे सर्वेक्षण आणि अभ्यास करण्यात आला. प्रो. अॅवनेर वेंगोश आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या या अभ्यासाचे निष्कर्ष ‘एन्व्हायर्नमेंटल सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी लेटर्स’ या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. युरॅनिअमचे पाण्यामध्ये प्रदूषण होण्याचा मुख्य स्रोत नैसर्गिक आहे. मात्र, मानवी हस्तक्षेप विशेषतः भूजलाचा अतिरिक्त प्रमाणामधील उपसा, वापर आणि नत्रयुक्त खताद्वारे होणारे प्रदूषणही कारणीभूत असू शकते, असे या अहवालात म्हटले आहे. पिण्याच्या पाण्यामध्ये युरॅनिअमचे प्रमाण अधिक असल्याचा किडनीसंदर्भात आजारांचे प्रमाण वाढत असल्याचे अन्य वैद्यकीय अभ्यासात दिसून आले आहे. या समस्येविषयी माहिती देताना ड्युक विद्यापीठातील निकोलस स्कूल ऑफ दी एन्व्हायर्नमेंट येथील भूरसायनशास्त्र आणि जल दर्जा विषयाचे प्रो. अॅवनेर वेंगोश म्हणाले, की आम्ही तपासणी केलेल्या राज्यापैकी राजस्थानमधील एक तृतीअंश विहिरीतील पाण्यामध्ये युरॅनिअमचे प्रमाण जागतिक आरोग्य संघटना आणि अमेरिकी पर्यावरण संरक्षण एजन्सीच्या पिण्यासाठी सुरक्षित पाण्याच्या निकषापेक्षा अधिक आढळले आहे. त्याचप्रमाणे भारतातील वायव्येकडील अन्य २६ जिल्ह्यांमध्ये, दक्षिण किंवा आग्नेय भागांतील नऊ जिल्ह्यांमध्ये भूजलामध्ये युरॅनिअमचे प्रमाण अधिक असल्याचे आढळले आहे. या अभ्यासामध्ये राजस्थान, गुजरात येथील सुमारे ३२४ विहिरीचे पाणी नमुन्याचे विश्लेषण केले. त्यातील युरॅनिअम आयसोटोपच्या गुणोत्तर मोजण्यात आले. त्याचवेळी राजस्थान, गुजरातसह अन्य १४ राज्यांत झालेल्या ६८ पूर्व अभ्यासाचा आढावा घेत विश्लेषण केले. पिण्याच्या पाण्याची सुरक्षितता ः जागतिक आरोग्य संघटनेच्या पिण्यासाठी सुरक्षित पाण्याचे निकषानुसार पाण्यातील युरॅनिअमचे प्रमाण ३० मायक्रोग्रॅम प्रतिलिटरपर्यंत असावे, असे असूनही ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड यांच्या पाणी तपासणीच्या निकषामध्ये युरॅनियमचा अद्यापही अंतर्भाव करण्यात आलेला नाही. संशोधिका रॅचेल एम. कॉयट यांनी सांगितले, की अनेक ठिकाणी पाणी धरून ठेवणाऱ्या खडकामध्ये नैसर्गिकरीत्या युरॅनियमचे प्रमाण अधिक आहे. त्याची पाण्यासोबत व हवेसोबत प्रक्रिया होऊन ऑक्सिडेशन होते. त्यातून ते पाण्यामध्ये विरघळण्याची प्रक्रिया घडते. या नैसर्गिक घटकांसोबतच भूजलाचा सिंचनासाठी वाढत असलेला वापरही अधिक प्रदूषणासाठी कारणीभूत ठरत आहे. या नव्या अभ्यासातून पुढे आलेल्या निष्कर्षामुळे सध्याच्या पाणी दर्जा निरीक्षण आणि तपासणी कार्यक्रमांची पुन्हा आखणी करण्याची गरज व्यक्त होत आहे. पिण्याच्या पाण्याची सुरक्षितता वाढवण्यासाठी उपचारात्मक आणि प्रतिबंधात्मक व्यवस्थापनाला प्राधान्य देण्याची गरज आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT