बंबल बी ला पर्यायच नाही
बंबल बी ला पर्यायच नाही 
मुख्य बातम्या

बंबल बी ला पर्यायच नाही

वृत्तसेवा

गेल्या काही वर्षांत सातत्याने बंबल बी या माश्यांची संख्या कमी होत आहे. अशा स्थितीमध्ये अन्य माश्या त्यांची जागा घेण्याची शक्यता संशोधक व्यक्त करत होते. मात्र, व्हर्जिनिया विद्यापीठामध्ये झालेल्या नव्या अभ्यासानुसार अन्य माश्यांमुळे पिकांना फायदा होण्याऐवजी हानी होण्याची शक्यता पुढे आली आहे. बंबल बी या माश्या परागीकरणासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहे. मधमाश्यांच्या रहिवासाचा ऱ्हास, कीडनाशकांचा वापर, वातावरणातील बदल, अन्य अस्थानिक प्रजातींशी होणारी स्पर्धा, अस्थानिक परजिवींचा वाढता प्रादुर्भाव अशा अनेक घटकांचा त्यांना फटका बसत आहे. या स्थितीमध्ये बंबल बींची संख्या कमी होत आहे. तेव्हा लहान आकाराच्या स्थानिक मधमाश्यांचा प्रजातींची संख्या वाढण्याची संधी असल्याचे संशोधकांचे मत होते. मात्र, या माश्या परागकणाचे वहन करण्याऐवजी पळवत असल्याने परागीकरणामध्ये अडचणी येत असल्याचे दिसून येते. हे संशोधन ‘जर्नल प्रोसिडिंग्ज ऑफ दी रॉयल सोसायटी ः बायोलॉजिकल सायन्सेस’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

  • व्हर्जिनिया विद्यापीठातील संशोधक मॅट कोस्की यांनी सांगितले, की बहुतांश सर्व प्रकारच्या माश्या या परागीकरणासाठी फायद्याच्या मानल्या जातात. मात्र, आमच्या अभ्यासामध्ये या माश्यांचा फायदा होण्याऐवजी तोटा होत असल्याचे आढळले आहे. ही बाब आश्चर्याचीच आहे. कारण लहान सॉलिटरी मधमाश्या आपल्या पिलांसाठी मोठ्या प्रमाणात परागकण पळवतात.
  • मॅट कोस्की आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ईशान्य अमेरिकेतील बेल फ्लावर (शा. नाव ः Campanula americana) या वनस्पतीवर लक्ष केंद्रित केले. त्यांनी बंबल बी आणि अन्य दोन लहान माश्यांचा फुलांच्या परागीकरणांवरील परिणाम तपासला. मधुकण गोळा करण्याच्या उद्देशाने फिरणारी बंबल बी जेवढे कण उचलते, त्यापेक्षा अधिक कणांचा अन्य फुलांपर्यंत प्रसार करते. हे प्रामुख्याने त्यांच्या केसाळ शरीरामुळे शक्य होते. परिणामी उत्तम परागीकरण होते.
  • लहान आणि मध्यम आकाराच्या मधमाश्या या फुलांच्या पुंकेसरांना भेट देतात. तिथून मोठ्या प्रमाणात परागकण उचलून आपल्या पिलांसाठी नेतात. परागीकरणावर व बीज उत्पादनावर ऋण परिणाम होतो. जर या माश्यांनी बंबलबीच्या आधी फुलांना भेट दिली असल्यास बंबल बीसाठीही परागीकरणासाठी कमी पराग शिल्लक राहिलेले असतात.
  • या अभ्यासामध्ये दक्षिण अलाबामा ते मिन्निसोटा भागातील सुमारे २३ वनस्पतींवरील बंबल बीच्या ऱ्हासाचे परिणाम तपासण्यात आले. ओहियोमध्ये परागीकरणाच्या कार्यक्षमतेवर अभ्यास झाला, तर व्हर्जिनिया येथे परागकणांचे वहन आणि त्यामुळे बियांची निर्मिती या मुद्द्यावर लक्ष केंद्रित केले होते.  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

    Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

    Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

    Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

    Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

    SCROLL FOR NEXT