करपा रोग प्रतिकारक भातजातींचा विकास शक्य
करपा रोग प्रतिकारक भातजातींचा विकास शक्य  
मुख्य बातम्या

करपा रोगप्रतिकारक भातजातींचा विकास शक्य

वृत्तसेवा

भातामध्ये करपा रोगाचा प्रादुर्भाव मॅग्नापोर्थे ओरायझे या बुरशीमुळे होतो. या रोगामुळे प्रति वर्ष होणाऱ्या नुकसानीमध्ये ६० अब्ज लोकांच्या आहाराचा प्रश्न सुटू शकतो. या करपा रोगाच्या प्रतिकारकतेसाठी आजवर न आढळलेला जनुक शोधण्यात अमेरिकी कृषी संशोधन सेवेतील वनस्पती रोगशास्त्रज्ञ युलिन जिया यांच्या गटाला यश आले आहे. त्यातून भात करपा रोगाच्या प्रतिकारक जाती विकसित करणे शक्य होईल. त्याचे निष्कर्ष जर्नल ‘नेचर कम्युनिकेशन्स’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. अमेरिकेमध्ये मध्य-दक्षिणेतील भात उत्पादक पट्ट्यामध्ये करपा रोगाच्या नियंत्रणासाठी बुरशीनाशकांच्या फवारणीसाठी एकरी २० डॉलरपर्यंत खर्च येतो. मात्र, जातनिहाय संवेदनशीलता आणि रोगाची तीव्रता यावर नियंत्रण अवलंबून असते. या रोगाच्या प्रतिकारकतेसाठी उपयुक्त ठरू शकेल अशी संरचना असलेले जनुक पीटीआर अमेरिकी संशोधकांना आढळले आहे. पीआय- टीए हे जनुक करपा प्रतिकारक भात जातीमध्ये असल्याचे संशोधकांना पूर्वीपासूनच ज्ञात आहे. हे नवे जनुक पीआय-टीएच्या सावलीप्रमाणे आहे. त्याविषयी माहिती देताना युलिन जिया यांनी सांगितले की, आमच्या संशोधनातून या दोन जनुकांचे वेगळेपण स्पष्ट होऊन पीटीआर जनुक स्वतंत्रपणे करपा नियंत्रणासाठी कारणीभूत ठरू शकत असल्याचे पुढे आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

International Labor Day : शेतकऱ्यांकडे माणूस म्हणून कधी पाहणार?

Farmer Issue : लोकशाहीच्या उत्सवात शेतकरी दुर्लक्षितच

Cashew Farming : काजू हंगाम अंतिम टप्प्यात

Agriculture Technology : पर्यावरणपूरक इंधन कांडी, गॅसिफायर तंत्रज्ञान

Agriculture Technology : पेरणी यंत्र, उपकरणांची देखभाल

SCROLL FOR NEXT