सातत्याने हेडर्स ठरू शकतात मेंदूसाठी हानीकारक
सातत्याने हेडर्स ठरू शकतात मेंदूसाठी हानीकारक 
मुख्य बातम्या

सातत्याने हेडर्स ठरू शकतात मेंदूसाठी हानीकारक

वृत्तसेवा

सध्या विश्वचषकामुळे फुटबॉलचा ज्वर सर्वत्र पसरलेला आहे. पदलालित्याबरोबरच हेडरद्वारे केलेला गोल हाही आकर्षणाचा विषय असतो. मात्र, हेडरद्वारे फटका मारणे, हे मेंदूच्या दृष्टीने हानीकारक ठरू शकत असल्याचा इशारा डेलावरे विद्यापीठातील संशोधकांनी दिला आहे. सातत्याने डोक्यावर होणाऱ्या या आघातामुळे शरीराच्या अल्पकालीन संतुलनाची समस्या उद्भवू शकते. हे प्राथमिक निष्कर्ष असून, दीर्घकालीन परिणामाविषयी जाणून घेण्यासाठी अधिक संशोधनाची गरज आहे. प्रो. जॉन जेका यांच्या गटाने क्लब येथील फुटबॉलपटूंकडून प्रश्नावली भरून घेऊन सर्वेक्षण केले. सराव आणि प्रत्यक्ष मॅचदरम्यान कितीवेळा हेडर मारला जातो, याचा अंदाज घेतला. सरासरी २२ वयाच्या खेळाडूकडून गेल्या वर्षभरामध्ये ४५१ वेळा बॉल हेडिंग केल्याचे लक्षात आले. अशा खेळाडूंना डोळे बंद करून फोम पॅडवरून चालायला लावले. या वेळी त्यांच्या कानामागे इलेक्ट्रोड लावून व न लावता चाचण्या घेण्यात आल्या. या इलेक्ट्रोडद्वारे आंतरकर्ण आणि मेंदू यांतील चेतापेशीवरील परिणाम मोजता आला. हा भाग संतुलनासाठी काम करतो. त्यानंतर ज्या खेळाडूंनी हेडरचा अधिक वापर केला त्यांच्या चालण्यामध्ये संतुलनाची समस्या येत असल्याचे लक्षात आले. निष्कर्षाविषयी माहिती देताना प्रो. जॉन जेका यांनी सांगितले, की डोक्यावर सातत्याने होत असलेल्या आघातामुळे मेंदूतील विचार करण्याची प्रक्रिया, स्मृतीविषयक समस्या उद्भवू शकतात. संरचनात्मक पातळीवर मेंदूतील पांढऱ्या घटकांवरही परिणाम होऊ शकतो. संतुलनावर परिणाम होण्याची शक्यता असली तरी अधिक अभ्यासाची आवश्यकता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Seed : कपाशीच्या बियाण्यांसाठी तेलंगणाची वारी

Bribe Arrest : निलंबन रद्द करण्यासाठी ५० हजारांच्या लाचेची मागणी

Animal Vaccination : पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण करा

Summer Sowing : दुष्काळी छायेतही २४ हजार हेक्टरवर पेरा

Summer Sowing : यवतमाळच्या शेतकऱ्यांची उन्हाळी तिळाला पसंती

SCROLL FOR NEXT