शेवंतीच्या 400 जाती विकसित करणारा अवलिया!
शेवंतीच्या 400 जाती विकसित करणारा अवलिया!  
मुख्य बातम्या

शेवंतीच्या ४०० जाती विकसित करणारा अवलिया!

वृत्तसेवा

गेल्या २९ वर्षांपासून बेल्जियम येथील पैदासकार विम डिक्‍लेर्क यांनी शेवंतीच्या सुमारे ४०० जाती विकसित केल्या आहेत. सध्या ते गेडी फ्लोरा या कंपनीमध्ये मुख्य पैदासकार म्हणून कार्यरत आहेत.    शेवंतीच्या आकर्षक फुलांना बाजारपेठेमध्ये आपली स्वतंत्र मागणी आहे. आकर्षकपणा, वैशिष्ट्यपूर्ण रंग आणि अधिक काळ टिकण्याची क्षमता यामुळे गुच्छासह घर सजावटीमध्ये त्यांचा वापर वाढला आहे. नव्या जातीच्या पैदास प्रक्रियेसाठी दोन ते तीन वर्ष लागतात. त्यानंतर अनेक चाचण्यांनंतर ती जात बाजारपेठेत उतरवायची की नाही, याचा निर्णय घेतला जातो. सध्या बाजारपेठेमध्ये असलेल्या शेवंतीच्या जातीपेक्षा विम डिक्‍लेर्क यांनी पैदास केलेल्या जातींची संख्या अधिक आहे.

अनेक नव्या जाती प्रतीक्षेत...

  • २०१९ मध्ये शेवंतीच्या फुलांची नव्या जाती बाजारात आणण्यासाठी संशोधन सुरू आहे.
  • वास्तविक पाहता शेवंती हे हंगामी आहे; मात्र अलीकडे हरितगृहामध्ये तापमान आणि प्रकाश यांचा कालावधी कमी जास्त करून वर्षातील बहुतांश काळ उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न केले जातात.
  • नव्या जातींच्या संशोधनासोबत सध्या प्रसारित जातींच्या सातत्यासाठीही विम यांचे प्रयत्न सुरू असतात. 
  • विम यांनी प्रिमो पिस्ताचे ही पहिली हिरव्या रंगाची शेवंती जातही विकसित केली आहे. त्याचप्रमाणे बेल्जियम मम ही जातही तिच्या पूर्ण गोलाकार आकर्षक फुलांसाठी व रोग प्रतिकारकतेसाठी प्रसिद्ध आहे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

    Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

    Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

    Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

    Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

    SCROLL FOR NEXT