मुख्य बातम्या

आर. बी. हर्बल अॅग्रोचे ‘भू-परीस’ बाजारात दाखल

सकाळ वृत्तसेवा

मार्केट ट्रेंडस्.. आर. बी. हर्बल अॅग्रो ही सीआयबी नोंदणीकृत जैविक कीटकनाशके व एफ. सी. ओ. ग्रेडच्या जैविक खतांच्या निर्मितीमध्ये कार्यरत कंपनी असून, त्यांनी पंढरपूर येथील वितरकांच्या स्नेहसंमेलनामध्ये भू-परीस हे उत्पादन बाजारात आणले आहे.

आर. बी. हर्बल अॅग्रो ही कंपनी जैविक कीटकनाशकांच्या उत्पादनामध्ये महाराष्ट्रामध्ये आघाडीवर असून, सीआयबी नोंदणीकृत सर्वाधिक कीटकनाशके तिच्या नावावर आहेत. ‘भू-परीस’ या उत्पादनात जैविक खते व आवश्यक जैविक कीटकनाशकांचा संयुक्तपणे समावेश असल्याने जमिनीतील अन्नद्रव्ये थंड तापमानात संतुलित प्रमाणात उपलब्ध होतात. पिकास नैसर्गिकरीत्या संजीवके मिळतात तसेच पीकसंरक्षणही होत असल्याचा कंपनीचा दावा आहे. याला शासनमान्य उत्पादन परवाना व विक्रीसाठी आवश्यक ओ. फार्मही उपलब्ध आहेत.  द्राक्षामध्ये घडावर पेपर लावण्याआधी बायोसा व्हिबीएमची फवारणी केल्यास मिलीबग नियंत्रण होते. काढणीआधी जैविक द्रव्यांची फवारणी केल्यास रेसिड्यूंचे प्रमाण कमी होण्यास मदत होत असल्याचा दावा कंपनीचे संचालक रामदास पाटील यांनी केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : वाढत्या उन्हाने वाढली होरपळ; देशातील अनेक ठिकाणी पुढील ५ दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा

Loksabha Election : ‘आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्यास निदर्शनास आणून द्या’

Soil Health : शेतीतून शाश्वत उत्पादन मिळण्यासाठी मृदा आरोग्य जपा

Natural Resource : निसर्गसंपदा वाचविण्याची अनोखी चळवळ

Goat Rearing : शेळीपालनात अभ्यासपूर्ण व्यवस्थापनाला प्राधान्य

SCROLL FOR NEXT