Training on post-harvest technology, packing at Agricultural Science Center 
मुख्य बातम्या

सोलापूर ः कृषि विज्ञान केंद्रात काढणी पश्चात  तंत्रज्ञान, पॅकिंगवर प्रशिक्षण 

सोलापूर ः कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ आणि कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण युवकांसाठी कौशल्य विकास आधारित ‘‘फळे व भाजीपाला पिकांचे काढणी पश्चात तंत्रज्ञान आणि पॅकिंग’’ याविषयावर नुकतेच सहा दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

टीम अॅग्रोवन

सोलापूर ः कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ आणि कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण युवकांसाठी कौशल्य विकास आधारित ‘‘फळे व भाजीपाला पिकांचे काढणी पश्चात तंत्रज्ञान आणि पॅकिंग’’ याविषयावर नुकतेच सहा दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.  कृषि विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. तानाजी वळकुंडे यांच्या हस्ते प्रशिक्षणाचे उदघाटन झाले. जी.डी. अन्नतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य राहुला पाटील, विषय विशेषज्ञ डॉ. विशाल वैरागर, प्रशांत महामुरे, प्रशांत कुचेकर, विषय विशेषज्ञ प्रा. दिनेश क्षीरसागर यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. वळकुंडे म्हणाले, ‘‘कौशल्य आधारित प्रशिक्षण हे शेतकऱ्यांसाठी निश्चितच फायदेशीर आहे. फक्त शेतीवर विसंबून राहण्याचे दिवस आता राहिलेले नाहीत. विशेषतः तरुणांनी शेतीला जोड म्हणून या व्यवसायाकडे पाहणे गरजेचे आहे. त्यातून निश्चितच त्यांना फायदा होईल. सद्यस्थितीत अशा उपक्रमांची गरज आहे,’’ असे सांगितले. प्रास्ताविकात श्री. क्षीरसागर यांनी सदर प्रशिक्षणाच्या आयोजनाची पार्श्वभूमी विषद करून शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट, युवक शेतकरी व महिला बचत गटांना फळे व भाजीपाला प्रक्रिया उद्योगात संधी असल्याचे सांगितले.  प्रशिक्षणासह प्रक्षेत्र भेटही  सहा दिवसाच्या या कार्यक्रमात प्रा. क्षीरसागर यांच्यासह तुषार गोरे यांनी केळी प्रक्रिया आणि मूल्यवर्धन, श्रीमती. अमृता राऊत यांनी फळे व भाजीपाला पिकांचे कमी खर्चाचे प्रक्रिया तंत्रज्ञान यांनी मार्गदर्शन केले. तसेच सोलापुरातील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र येथे प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. निलेश गायकवाड, डॅा. नम्रता गिरी यांनी डाळिंब प्रक्रिया उद्योग व मूल्यवर्धन– विकसित तंत्रज्ञान, यंत्रसामुग्री व नाविन्यपूर्ण बाबीबाबत मार्गदर्शन केले. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Peek Pahani: शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं! ई- पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल, सहायकांची नियुक्ती, शासन निर्णय जारी

Farmer Fraud: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा

Pikvima Scam: पीकविमा अर्जासाठी सीएससी चालकांकडून शेतकऱ्यांची लूट

Dairy Farming: नवतंत्रज्ञानातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य

Pik Vima Dharashiv: गतवर्षीच्या खरिपातील पीकविम्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT