Three persons from Solapur are included in the promotion 
मुख्य बातम्या

पदोन्नतीतील कृषिसहसंचालकात सोलापूरच्या तिघांचा समावेश 

सोलापूर ः राज्याच्या कृषी विभागाने वर्ग एकमधील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी या पदावर कार्यरत असलेल्या आठ अधिकाऱ्यांना कृषिसहसंचालक या पदावर पदोन्नती दिली आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील तीन अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

टीम अॅग्रोवन

सोलापूर ः राज्याच्या कृषी विभागाने वर्ग एकमधील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी या पदावर कार्यरत असलेल्या आठ अधिकाऱ्यांना कृषिसहसंचालक या पदावर पदोन्नती दिली आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील तीन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील बसवराज बिराजदार आणि अशोक किरनळ्ळी या दोघांचा तर बार्शी तालुक्यातील पोपट शिंदे यांचा यात समावेश आहे. श्री. बिराजदार यांनी यापूर्वी सोलापुरात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. सध्या ते पुणे विभागाचे प्रभारी सहसंचालक म्हणून काम करत होते. आता त्यांना कोल्हापूर विभागाचे सहसंचालक म्हणून पदोन्नती मिळाली आहे. अशोक किरनळ्ळी यांना पुण्यात फलोत्पादन संचालक या पदावर नियुक्ती मिळाली आहे. तर पोपट शिंदे यांना पुण्यात नियोजन आणि अंदाजपत्रक विभागात सहसंचालक पदावर नियुक्ती मिळाली आहे. एकाचवेळी जिल्ह्यातील तीन अधिकाऱ्यांना पदोन्नती आणि चांगल्या ठिकाणी नियुक्ती मिळाल्याने आनंद व्यक्त केला.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fodder Seed Subsidy: जनावरांच्या चाऱ्यासाठी सरकारची मोफत बियाणे योजना; शेतकऱ्यांना ४ हजार, तर शेतकरी गटांना मिळणार २० हजार रुपयांपर्यंतचे अनुदान

Grape Disease Management: फळछाटणीनंतरचे केवडा रोग व्यवस्थापन

Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ योजना चर्चेत; महिला-बालविकास विभागाच्या सात योजनांना कात्री

Veterinary Technology: पशू आनुवंशिक सुधारणेसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर

Drought Protest : तात्काळ मदतीची मागणी! दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांचे उद्यापासून बेमुदत उपोषण

SCROLL FOR NEXT