Solapur: Former MLA Dilip Mane's sit-in agitation over exhausted electricity bill
Solapur: Former MLA Dilip Mane's sit-in agitation over exhausted electricity bill 
मुख्य बातम्या

सोलापूर ः थकीत वीजबिलावरून माजी आमदार दिलीप माने यांचे ठिय्या आंदोलन 

टीम अॅग्रोवन

 सोलापूर ः शेतीपंपाच्या वीजबिलाच्या थकबाकीपोटी सरसकट डीपीतून वीज तोडू नका, ज्यांनी बिल भरले आहे, त्यांची वीज सुरू करा, यासह हप्त्याहप्त्याने बिल भरण्यास मुदत द्या, या मागणीसाठी माजी आमदार दिलीप माने यांनी महावितरण कार्यालयात अधीक्षक अभियंत्यांच्या दालनात सोमवारी (ता.७) दिवसभर ठिय्या आंदोलन केले. 

उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकऱयांसह माजी आमदार माने यांनी जुनी मिल कंपाउंडमधील महावितरणच्या मुख्य कार्यालयात पोहोचले. त्यावेळी अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांच्या दालनात त्यांनी मागण्या मांडत थेट ठिय्या मारला. काही थकबाकीदारांमुळे पूर्ण ट्रान्स्फॉर्मरचा विद्युतपुरवठा तोडू नये, शेतकऱ्यांची थकबाकी टप्प्याटप्प्याने घ्यावी, विद्युत पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी यावेळी त्यांनी केली. थकबाकीदार शेतकऱ्यांना पाच हजारांपासून दहा हजारांपर्यंत रक्कम भरण्यास परवानगी देण्यात यावी. तसेच एका ट्रान्स्फॉर्मरवर १२ ते १५ कनेक्शन असतील आणि काहींनी थकबाकी भरली नाही, म्हणून पूर्ण ट्रान्स्फॉर्मरचा विद्युतपुरवठा तोडणे चुकीचे आहे, असे त्यांचे म्हणे होते. पण अधीक्षक अभियंता सांगळे हे ऐकायला तयार नव्हते, त्यामुळे तब्बल पाच ते सहा तास तिथेच माजी आमदार माने यांनी ठिय्या दिला. शेवटी टप्प्याटप्प्याने बिल भरण्यास आणि सरसकट वीजतोडणी न तोडता थकबाकीदाराचीच वीज तोडण्याचे आश्‍वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.  

   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : कोकणात उष्ण, दमट हवामानाचा इशारा

POCRA Scheme : पोकरा प्रकल्पाच्या पहिल्या टप्‍प्याची आवराआवर

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

SCROLL FOR NEXT