Rabbi subsidized seeds available Appeal of the Department of Agriculture
Rabbi subsidized seeds available Appeal of the Department of Agriculture 
मुख्य बातम्या

नंदुरबार : रब्बीचे अनुदानित बियाणे उपलब्ध  कृषी विभागाचे आवाहन 

टीम अॅग्रोवन

नंदुरबार : कृषी विभागाच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान आणि ग्रामबीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत रब्बी हंगामासाठी हरभरा, रब्बी ज्वारी व गहू बियाणे शेतकऱ्यांना अनुदानावर उपलब्ध करून देण्यात आले असून, अनुदानित बियाण्यांचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.  जिल्ह्यात हरभरा एक हजार ३१८ क्विंटल, रब्बी ज्वारी ३४० क्विंटल व गहू ८०४ क्विंटल इतके अनुदानित बियाण्याचे तालुकानिहाय वितरणाचे नियोजन करण्यात आले आहे. १० वर्षे आतील प्रमाणित बियाणे हरभरा फुले विक्रांत, राजविजय २०२, फुले विक्रमसाठी प्रतिकिलो २५ रुपये अनुदान, रब्बी ज्वारी फुले रेवती, फुले सुचित्रासाठी प्रतिकिलो ३० रुपये अनुदान, तसेच ग्रामबीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत हरभरा जॅकी ९२१८ साठी प्रतिकिलो २५ रुपये अनुदान, तर गहू फुले समाधान, लोकवन व एच.डी. २१८९ साठी १६ किलो प्रति अनुदान राहील.  शेतकऱ्यांना अनुदानित बियाणे महाबीज व राष्ट्रीय बीज निगम यंत्रणेकडील वितरकांमार्फत तालुकास्तरावर परमिटद्वारे वितरणाचे नियोजन करण्यात आले असून, अनुदानित बियाण्याचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज केलेले शेतकरी तसेच लक्ष्यांकपूर्तीसाठी ऑफलाइन पद्धतीने शेतकरी निवडण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत कार्यवाही सुरू असून, या अनुदानित बियाण्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नंदुरबार यांनी केले आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : वाढत्या उन्हाने वाढली होरपळ; देशातील अनेक ठिकाणी पुढील ५ दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा

Loksabha Election : ‘आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्यास निदर्शनास आणून द्या’

Soil Health : शेतीतून शाश्वत उत्पादन मिळण्यासाठी मृदा आरोग्य जपा

Natural Resource : निसर्गसंपदा वाचविण्याची अनोखी चळवळ

Goat Rearing : शेळीपालनात अभ्यासपूर्ण व्यवस्थापनाला प्राधान्य

SCROLL FOR NEXT