Livestock vaccination slows down due to low manpower 
मुख्य बातम्या

पशुधन लसीकरण संथ कमी मनुष्यबळाचे कारण 

जळगाव ः खानदेशात पशुधनाचे लसीकरण संथ झाले आहे. जिल्हा परिषदेतर्फे याबाबत चालढकल केली जात असून, शिबिरांचे आयोजन अपवाद वगळता झालेले नसल्याची स्थिती आहे.

टीम अॅग्रोवन

जळगाव ः  खानदेशात पशुधनाचे लसीकरण संथ झाले आहे. जिल्हा परिषदेतर्फे याबाबत चालढकल केली जात असून, शिबिरांचे आयोजन अपवाद वगळता झालेले नसल्याची स्थिती आहे. 

लाळ्या खुरकूत, लंपी स्कीनसंबंधी प्रतिबंधात्मक कार्यवाहीत पशुसंवर्धन विभाग अपयशी ठरला आहे. मध्यंतरी पावसाचे कारण सांगितले जात होते. नंतर कमी मनुष्यबळ व औषधांच्या तटवड्याची बतावणी सुरू आहे. जिल्हा परिषदेचे सुमारे १२५ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. यात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. शिवाय पर्यवेक्षक व इतर पदेही रिक्त आहेत. एका दवाखान्याद्वारे सात ते आठ गावांमध्ये पशुवैद्यकीय सेवा देण्याची वेळ येते. काही दवाखान्यांमध्ये प्रभारी अधिकारी आहेत. यामुळे सेवा विस्कळीत झाली आहे. याचा परिणामदेखील लसीकरणावर झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. लंपी स्कीनची समस्या जिल्ह्यात वाढली आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांचे पशुधन दगावले आहे. 

काही दिवस सेवा व्यवस्थित देण्याचा प्रयत्न झाला, पण पुन्हा खासगी पशुवैद्यकांची मदत शेतकऱ्यांना घ्यावी लागत आहे. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाचा कारभार व्यवस्थित नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. फक्त जिल्हा परिषदेच्या सदस्यांची मर्जी राखून कामकाज रेटले जाते. पण इतर, सामान्य शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाते, असाही आरोप शेतकरी करीत आहेत.   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan Waiver : संपूर्ण कर्जमाफी, ऊसाला ४ हजार ५०० रुपयांचा दर, धानाला ३ हजार ५०० हमीभाव, महिलांना दरमहा २ हजार ५०० रुपये देण्याचे आश्वासन; अभिनेते विजय यांच्या पक्षाचा जाहीरनामा

Orchard Farmers Support: फळबाग उत्पादकांना आर्थिक आधार

Krishi Seva Kendra: सतरा कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

Onion Storage Tips: कांदा साठवताना होणाऱ्या चुका टाळा, नुकसान वाचवा

Rural Roads Survey: ग्रामपंचायतीच्या मालकीच्या रस्त्यांच्या सर्वेक्षणाचा निर्णय

SCROLL FOR NEXT