For Rabbi, the mill in Khandesh has run out of water, the benefit of Hatnur's water 
मुख्य बातम्या

रब्बीसाठी खानदेशात आवर्तन सुटले गिरणा, हतनूरच्या पाण्याचा लाभ 

जळगाव ः खानदेशात विविध प्रकल्पांमधून मागील महिन्यात रब्बीसाठी पहिले आवर्तन सोडण्यात आले. जळगाव जिल्ह्यात गिरणा, हतनूर व वाघूर प्रकल्पातून पाणी सोडण्यात आले होते.

टीम अॅग्रोवन

जळगाव ः  खानदेशात विविध प्रकल्पांमधून मागील महिन्यात रब्बीसाठी पहिले आवर्तन सोडण्यात आले. जळगाव जिल्ह्यात गिरणा, हतनूर व वाघूर प्रकल्पातून पाणी सोडण्यात आले होते. 

गिरणा, वाघूर, हतनूर, धुळ्यातील पांझरा, मालनगाव, सोनवद, अनेर आदी प्रकल्प १०० टक्के भरले होते. यंदा या प्रकल्पांमधून तीन वेळेस रब्बीसाठी आवर्तन सुटेल, असे जाहीर करण्यात आले होते. शेतकऱ्यांना पाणी मागणीचे अर्ज करण्याचे आवाहन नोव्हेंबरमध्ये करण्यात आले होते. डिसेंबरच्या मध्यात काही प्रकल्पांमधून पाणी सोडण्यात आले. तर काही प्रकल्पांमधून डिसेंबरच्या अखेरीस पाणी सोडण्यात आले. गिरणा, हतनूर, वाघूरच्या माध्यमातून सुमारे ३५ हजार हेक्टर क्षेत्र भिजते. यंदाही एवढ्या क्षेत्रासाठी पाण्याचे नियोजन करण्यात आले. 

धुळ्यात पांझरा प्रकल्पातूनही पाणी सोडण्यात आले. तसेच अनेर प्रकल्पातूनही पाणी सोडण्यात आले. ज्वारी, हरभरा ही पिके अधिक आहेत. तसेच गव्हाची पेरणीदेखील या प्रकल्पांच्या लाभक्षेत्रात झाली आहे. पेरणी वाढली असून, पाण्याचे काटेकोर नियोजन करावे लागणार आहे. गिरणा धरणाच्या पाटचाऱ्यांची दैना असल्याने काही शेतकऱ्यांना पुरेसे किंवा हवे तेवढे पाणी मिळू शकले नाही. गिरणा धरणातून चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल व धरणगाव या तालुक्यांत पाणी सोडण्यात आले. हतनूरमधून रावेर, यावल व चोपडा तालुक्यासाठी पाणी सोडण्यात आले. वाघूर प्रकल्पातून भुसावळ, जळगाव तालुक्यातील रब्बीला लाभ झाला. अनेर धरणातून जळगावमधील चोपडा, धुळ्यातील शिरपूर तालुक्यात रब्बीसाठी पाणी मिळाले. पांझरा प्रकल्पाच्या माध्यमातून धुळ्यातील साक्री, धुळे तालुक्यातील शेतशिवार भिजले. पुढेही लवकर पाणी सोडले जाईल. तीन वेळेस पाणी मिळणार असल्याने पिके जोमात येतील, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT