Extortion of farmers in Jalgaon land records office 
मुख्य बातम्या

जळगावच्या भूमिअभिलेख कार्यालयात शेतकऱ्यांची पिळवणूक 

जळगाव ः भूमिअभिलेख कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांबाबत होत असलेल्या तक्रारींची संख्या वाढत आहे. नकाशे, मोजणी प्रकरणे प्रलंबित आहेत. याबाबत कडक शब्दांत या कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची कानउघाडणी करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

टीम अॅग्रोवन

जळगाव ः भूमिअभिलेख कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांबाबत होत असलेल्या तक्रारींची संख्या वाढत आहे. नकाशे, मोजणी प्रकरणे प्रलंबित आहेत. याबाबत कडक शब्दांत या कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची कानउघाडणी करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.  जळगाव तालुका भूमिअभिलेख कार्यालयाला पाकलकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भेट द्यावी, अशी मागणीदेखील केली जात आहे. या कार्यालयाजवळ जिल्हाधिकारी, प्रांत यांचे कार्यालय आहे. पण या कार्यालयातील कुणावरही कुणाचेच नियंत्रण नाही, अशी स्थिती आहे. नक्कल, नकाशे मागणीचे अनेक अर्ज दोन ते तीन महिने प्रलंबित ठेवले जातात. कार्यालयात कर्मचारी वेळेवर येत नाहीत. सर्वसामान्य लोकांची आणि शेतकऱ्यांची उतारे, नकाशे, दाखले यांची कामे होत नाहीत. प्रत्येक वेळी या कार्यालयात येणाऱ्यांना अधिकारी बाहेर मोजणीसाठी गेले असल्याचे सांगितले जाते. छोट्या छोट्या कामांसाठी जनतेला हेलपाटे मारावे लागतात, अशी ओरड अनेकदा झाली आहे. पण कुणी दखल घेत नाही.  कार्यालयातील संबंधितांची कानउघाडणी, समज देण्याची गरज आहे. कार्यालयाच्या कारभाराबाबत आलेल्या ढिसाळपणाबाबत ग्रामस्थ, शेतकरी बोलत नाहीत. कारण त्यांची कामे लागलीच अडकवून ठेवली जातात. मोजणी होऊन चार महिने झाले, तरीदेखील मोजणीचे प्रकरण पूर्ण नाही. खुणा दिल्या जात नाहीत. टाळाटाळ सतत केली जाते. उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.  आमच्या कार्यालयात एकही प्रकरण प्रलंबित नाही. सर्व कामे वेळेत होत आहेत. पण कुण्या शेतकऱ्याची अडवणूक झाली असल्यास त्यांनी मला येवून सांगावे, तक्रार योग्य असेल तर ती दूर केली जाईल.  - शीतल लेकुरवाळे, उपअधीक्षक, भूमी अभिलेख, जळगाव   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ahilyanagar Water Crisis: अहिल्यानगर जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढतेय

Modern Farming Techniques: शेतकऱ्यांनी जाणले संत्रा-कापूस पिकाचे तंत्रज्ञान

Agriculture Department Inspection: खत-बियाणे विक्रेत्यांना दणका

Rainfall Sowing Advisory: मॉन्सूनपूर्व पावसावर पेरणीची घाई करू नये : दत्तकुमार कळसाईत

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा, ३४४ कोटी निधी मंजूर

SCROLL FOR NEXT