Dhule: Online application process for animal husbandry schemes started 
मुख्य बातम्या

धुळे ः पशुसंवर्धनाच्या योजनांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू 

धुळे ः पशुसंवर्धन विभागातर्फे २०२१-२२ साठी राज्यस्तरीय नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत पात्र पशुपालक, शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार युवक, युवती व महिलांनी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एस. पी. विसावे यांनी केले आहे.

टीम अॅग्रोवन

धुळे ः पशुसंवर्धन विभागातर्फे २०२१-२२ साठी राज्यस्तरीय नावीन्यपूर्ण योजना व जिल्हास्तरीय योजनेंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी पात्र पशुपालक, शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार युवक, युवती व महिलांनी १८ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एस. पी. विसावे यांनी केले आहे. 

वैयक्तिक लाभाच्या योजनेंतर्गत प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी राज्यस्तरीय नावीन्यपूर्ण योजनेत तीन वर्षे ऑनलाइन अर्ज मागविणे व लाभार्थ्यांची निवड करण्यात येते. आता यावरच जिल्हास्तरीय विविध योजनांसाठी ही संगणकप्रणाली लागू केली आहे. यात शासनाने एखाद्या योजनेसाठी अर्ज केल्यानंतर लाभार्थ्यास दर वर्षी पुन्हा अर्ज करावा लागू नये, म्हणून तयार केलेली प्रतीक्षायादी पुढील पाच वर्षांपर्यंत लागू ठेवण्याची सुविधा केली आहे. त्यांना प्रतीक्षायादीतील क्रमानुसार लाभार्थी हिस्सा व अन्य बाबींसाठी नियोजन करणे शक्य होणार आहे. नावीन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेंतर्गत दुधाळ गायी, म्हशीचे गटवाटप करणे, शेळी, मेंढी गटवाटप करणे, १००० मांसल पक्ष्यांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीसाठी अर्थसाहाय्य देणे, १०० कुक्कुट पिल्लांचे वाटप व २५-३ तलंगा गट वाटपासाठी लाभार्थ्यांची निवड ऑनलाइन करण्यात येईल. पशुपालकांना डेअरी, पोल्ट्री किंवा शेळीपालनापैकी ज्या योजनेसाठी अर्ज करावयाचा आहे ती निवड करण्याची सुविधा, अर्ज व योजनांची संपूर्ण माहिती https://ah.mahabms.com हे संकेतस्थळ व अँड्रॉइड मोबाईलवर AH-MAHABMS या ॲपद्वारे १८ डिसेंबरपर्यंत उपलब्ध करून दिली आहे. या योजनेसाठी अर्ज फक्त ऑनलाइन स्वीकारण्यात येतील. अर्ज भरताना अर्जदाराने नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठविण्यात येणार असल्याने कुठल्याही परिस्थितीत अर्जदाराने मोबाईल क्रमांकात बदल करू नये.   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing 2026 : पावसाची तूट, पेरणीला फटका; कापूस आणि सोयाबीन लागवड पिछाडीवर

Goat Farming: शेळीपालनातून मिळविले आर्थिक स्थैर्य

Farmer Success Story: गावरान लसूण उत्पादनातून मिळविली वेगळी ओळख

Environmental Conservation: वृत्तांत उप्पुगल गाव भेटीचा!

MGNREGA: ‘राम’भरोशावर रोजगार!

SCROLL FOR NEXT