Deputy Speaker instructed to convene a meeting for Krishna-Bhima stabilization 
मुख्य बातम्या

सोलापूर ः कृष्णा-भीमा स्थिरीकरणासाठी बैठक लावण्याचे उपसभापतींचे निर्देश 

सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेबाबत मंगळवारी (ता. २८) विधान परिषदेत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी प्रश्न मांडला. तसेच याबाबत आम्ही सातत्याने पाठपुरावा करतो आहोत. पण दखल घेतली जात नाही, याकडे लक्ष वेधले.

टीम अॅग्रोवन

सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेबाबत मंगळवारी (ता. २८) विधान परिषदेत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी प्रश्न मांडला. तसेच याबाबत आम्ही सातत्याने पाठपुरावा करतो आहोत. पण दखल घेतली जात नाही, याकडे लक्ष वेधले. त्यावर संबंधित मंत्र्यांसह कृष्णा खोरे महामंडळाच्या निवृत्त अधिकाऱ्यांची बैठक लावावी. तसेच दौरा करून प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी योग्य पावले उचला, असे उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी निर्देश दिले.  हा प्रश्‍न सविस्तरपणे मांडताना श्री. मोहिते पाटील म्हणाले, ‘‘सोलापूर, सांगली, सातारा, उस्मानाबाद, पुणे आणि बीड या सहा जिल्ह्यांतील ३१ तालुक्यांतील १२ लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी २००४ मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी या योजनेला मंजुरी दिली. पण नंतर या योजनेकडे दुर्लक्ष झाले. तेलंगणामधील कालेश्‍वरम हा एक लाख कोटींचा प्रकल्प पाच वर्षांत पूर्ण झाला. मग हा प्रकल्प का होऊ शकत नाही, असा प्रश्‍नही त्यांनी केला. वास्तविक, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातून पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी उजनीत आणण्यासाठी हा प्रकल्प आहे. याच पाण्यावर पुढे या जिल्ह्यांतील पाण्याची सोय होणार आहे, पण याबाबत कोणीच विचार करत नाही, असेही ते म्हणाले. या प्रकल्पासाठी निधीचे कारण सांगितले जाते. पण उजनीतून वाळू उपसा करावा, या वाळूच्या महसूलापोटी जमा होणाऱ्या निधीतून हा प्रकल्प पूर्ण होईल, तसे शक्य असल्याचे एका संस्थेच्या अहवालात म्हटले आहे,’’ याकडेही त्यांनी लक्ष वेधले.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT