Dadar sorghum harvest will start in Khandesh 
मुख्य बातम्या

खानदेशात दादर ज्वारीची कापणी सुरू होणार 

जळगाव ः खानदेशात दादर ज्वारी अनेक भागांत पक्व होऊन कापणी, मळणीवर येत आहे. आगाप पेरणीची तापी, गिरणा, पांझरा नदीकाठच्या ज्वारी पिकाची लवकरच कापणी सुरू होईल, अशी स्थिती आहे.

टीम अॅग्रोवन

जळगाव ः खानदेशात दादर ज्वारी अनेक भागांत पक्व होऊन कापणी, मळणीवर येत आहे. आगाप पेरणीची तापी, गिरणा, पांझरा नदीकाठच्या ज्वारी पिकाची लवकरच कापणी सुरू होईल, अशी स्थिती आहे. 

कोरडवाहू रब्बी पीक म्हणून खानदेशात दादर ज्वारीची ओळख आहे. पारंपरिक बियाण्याची पेरणी शेतकरी करतात. काळ्या कसदार क्षेत्रात एकरी आठ ते १० क्विंटल ज्वारीचे उत्पादन घेतले जाते. तसेच पशुधनाला सकस चाराही उपलब्ध होतो. यंदा खानदेशात सुमारे ५० हजार हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे. त्यात दादर ज्वारीचे पीक अधिक आहे. यात ऑक्टोबरच्या मध्यात पेरणी केलेले पीक मळणी, कापणीवर आले आहे. अनेक भागात पीक जोमात आहे. मध्यंतरी वेगाच्या वाऱ्याने पिकाचे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, चोपडा, धुळ्यातील शिरपूर भागात नुकसान झाले. जळगाव जिल्ह्यात जळगाव, चोपडा, अमळनेर, पाचोरा, भडगाव आदी भागांत ज्वारी पीक अधिक आहे. या भागात अनेक शेतकरी ज्वारी कापणी, मळणीची तयारी करीत आहेत. कापणीसाठी गावोगावी मजुरांचे गट तयार झाले आहे. एकरी तीन ते साडेतीन हजार रुपये मजुरी दर ज्वारी कापणी, कणसे खुडून ती एका ठिकाणी गोळा करणे, कडबा गोळा करणे आदी कामांसाठी घेतला जात आहे. मागील वर्षी अनेक तालुक्यांमध्ये मजूरटंचाई होती. कोविडचा प्रकोपही फेब्रुवारीपासून सुरू झाला होता. यामुळे शेतीकमांवरही परिणाम झाला होता. यंदाही कोविडचा प्रकोप आहे, पण मृत्युदर व दवाखान्यात दाखल करण्याची गरज कमी असल्याने मजूरटंचाई कमी राहील, असेही चित्र आहे. पीक दर्जेदार आहे. यामुळे बाजारात बऱ्यापैकी दर मिळतील, अशीदेखील अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bamboo Plantation: जलसंधारणाच्या कामावर उभे राहिले ‘बांबू बेट’

2014 Election Promises BJP: भाजपने आश्वासनांची पूर्तता करावी : खासदार अमर काळे

Farm Loan Waiver: १२ लाख शेतकऱ्यांची अट टाकून अडवणूक; कर्जमाफीवरून कैलास पाटील यांचा विधानसभेत आरोप

Sugarcane Payment Issue: ‘गोकुळ शुगर’च्या थकीत ऊसबिलांसाठी उद्या कल्याणशेट्टी यांच्या घरासमोर ठिय्या

National Krishi Shakti Award: डॉ. वसंत ढिकले यांना राष्ट्रीय ‘कृषी शक्ती पुरस्कार’

SCROLL FOR NEXT