Sugarcane harvesting Agrowon
मुख्य बातम्या

Sugarcane Season : ...अन्यथा कारखान्यांना एकही ऊस तोडणी मशीन देणार नाही ; जाधव

Team Agrowon

Pune News : राज्यातील ऊसतोडणी मशीनचे (हार्वेस्टर) तब्बल ३०० कोटी रुपयांचे अनुदान बाकी आहे. मागील २०१८ पासून ते अनुदान मिळत नाही. येत्या महिनाभरात ऊसतोडणी मशीनला अनुदान देण्याचा निर्णय न झाल्यास येणाऱ्या गळीत हंगामात एकही मशीन चालू होणार नाही. याशिवाय काही कारखान्यांचे मागील हंगामातील तोडणी वाहतूक बिल अजून दिलेले नाही. अशा साखर कारखान्याला एकही मशीन न देण्याचा इशारा राज्य मशीन मालक संघटनेचे अध्यक्ष अमोलराजे जाधव यांनी दिला आहे.

श्री. जाधव म्हणाले की, शेतीक्षेत्रामध्ये यांत्रिकीकरण व्हावे, यासाठी कृषी व सहकार खात्याच्या माध्यमातून केंद्र व राज्याच्या सहकार्यातून विविध योजना सुरू केल्या. या मशीनसाठी केंद्र आणि राज्य शासनातर्फे राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून अनुदान उपलब्ध करून दिले जात होते. ते २०१७ पर्यंत चालू होते. २०१७ मधील २३ मशीन अनुदानासाठी प्रलंबित आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Retreating Monsoon : परतीचा पाऊस -हवी अधिक स्पष्टता

PDKV : ‘पंदेकृवि’चा चेहरामोहरा बदलतोय

Bribery Case : महा-ई-सेवा केंद्रचालक ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

PDKV Shiwarferi : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात शिवारफेरीला प्रारंभ

Soybean Cotton Subsidy : सोयाबीन, कापूस अनुदानासाठी ९१ लाख हेक्टर पात्र

SCROLL FOR NEXT