Cotton Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Rate Vidrbha: विदर्भातील कोणत्या बाजारात कापसाला मिळतोय सर्वाधिक दर?

मागच्या आठवड्याभरात कापसाची आवक सावनेर, हिंगणघाट आणि मानवत बाजारात सर्वाधिक झाली होती. दरातील सुधारणा पाहून शेतकरी कापसाची विक्री करत आहेत.

Team Agrowon

पुणे- राज्यातील बाजारात मागील आठवडाभर कापूस दरात (Cotton Rate) काहीशी सुधारणा पाहायला मिळाली.

विदर्भ आणि मराठवाड्यातील प्रमुख बाजारपेठात कापसाची (Cotton Market Marathwada-Vidarbha) आवक स्थिर होती.

मागच्या आठवड्याभरात कापसाची आवक सावनेर, हिंगणघाट आणि मानवत बाजारात सर्वाधिक झाली होती. दरातील सुधारणा पाहून शेतकरी कापसाची विक्री करत आहेत. 

हिंगणघाट बाजारात आठवड्याभरात ३० हजार क्विंटल कापसाची आवक झाली.

तर सावनेर बाजारात ११ हजार ६५० क्विंटल कापसाची आवक झाली. तसेच मानवत बाजारात  ६ हजार क्विंटल कापूस आवक झाली. 

राज्यातील कापूस बाजार मागील दोन महिन्यापासून दबावात आहेत. परंतू आंतरराष्ट्रीय पातळीवर कापूस दर वाढीसाठी स्थिती अनुकूल आहे. त्यामुळे कापसाला उठाव मिळू शकतो, असा जाणकारांचा अंदाज आहे.

मराठवाडा आणि विदर्भातील बाजारात कापसाच्या दरात १०० ते २०० रुपयांनी सुधारणा झाली होती.

मागील आठवड्यात कापसाला सर्वाधिक दर विदर्भातील प्रमुख कापूस बाजार हिंगणघाट ८१०० ते ८२०० रुपये प्रतिक्विंटल मिळाला.

आठवड्याच्या सुरुवातीला दर ८ हजारावर होते. त्यामध्ये सुधारणेचा कल दिसून आला.

विदर्भातील दुसरा प्रमुख बाजार असलेल्या सावनेरमध्ये कापसाला सरासरी ७ हजार ८०० ते ७ हजार ९०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. 

दरम्यान, होळी सणानिमित्त बाजारातील कापसाची आवक ६ आणि ७ मार्चला थंडावली होती. परंतू काही बाजारात कापसाचे व्यवहार झाले होते. 

देशातही सूतगिरण्यांकडून कापसाला उठाव आहे. निर्यातही सुरळीत आहे. सरकी पेंड आणि तेलाकडूनही आता आधार मिळण्याची शक्यता आहे.

परिणामी देशात कापसाचे भाव सुधारण्यास अनुकूल स्थिती आहे. मात्र उद्योगांकडून दर दबावात ठेवले जात आहेत.

शेतकऱ्यांनी बाजाराचा अंदाज घेऊन कापूस विक्री केली तर कापूस बाजारात सुधारणा होऊ शकते, असेही जाणकारांचे आवाहन आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : सातारा जिल्ह्यात १ लाख शेतकऱ्यांना पीकविम्याचा आधार

Delhi Farmers Meeting : ‘दिल्ली’ने ऐकल्या शेतकऱ्यांच्या व्यथा

Rabi Crop Seminar : संकटाच्या स्थितीत कृषी विभाग, कृषी विद्यापीठ सदैव शेतकऱ्यांसोबत; रब्बी पीक परिसंवादात तज्ज्ञांचा दिलासा

Chimur Farmers Protest : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी चिमूरमध्ये आक्रोश मोर्चा

Sangli Bank Election : सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू

SCROLL FOR NEXT