Tur rate  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Rate : तुरीला मराठवाडा आणि विदर्भाच्या बाजारात काय दर मिळतोय?

विदर्भातील वाशिम आणि कारंजा या प्रमुख बाजारात बुधवारी दुपारपर्यंत एकूण २ हजार क्विंटल तुरीची आवक झाली.

Team Agrowon

पुणे- राज्यातील बाजारात नवी तूर दाखल झाली आहे. परंतू तुरीची आवक नगण्य आहे.

मराठवाडा आणि विदर्भातील प्रमुख तूर बाजारात तुरीची आवकही दिवसाला २  ते ३ हजार क्विंटलच्या दरम्यान पाहायला मिळत आहे. 

विदर्भातील खामगाव, कारंजा, अकोला, बुलढाणा, मलकापुर बाजारात तुरीची आवक मागील आठवडाभर स्थिर होती.

परंतू होळी सणानिमित्त मागील तीन दिवसात तूर आवक नगण्य अशीच राहिली.

तसेच मराठवड्यातील लातूर, जालना आणि उदगीर बाजारातही आवक नगण्य अशीच राहिली.

विदर्भातील वाशिम आणि कारंजा या प्रमुख बाजारात बुधवारी दुपारपर्यंत एकूण २ हजार क्विंटल तुरीची आवक झाली.

तर मराठवाड्यातील पैठण बाजारात ४५ क्विंटल तुरीची आवक झाली.

राज्यात तुरीला ७ हजार २०० ते ७ हजार ९०० रुपये दरम्यान आहेत.

तर मराठवाड्यात ७ हजार ५०० ते ७ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटलची सरासरी दरपातळी आहे.

तसेच विदर्भातील बाजारात तुरीला ७ हजार २०० ते ८ हजार १८० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला आहे. 

बुधवारी म्हणजे ८ मार्च रोजी मराठवाड्यातील पैठण आणि गंगापूर बाजारात तुरीला सर्वाधिक ७ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.

तर विदर्भातील वाशिम बाजारात सर्वाधिक ८ हजार १०० रुपये प्रतिक्विंटल आणि कारंजा बाजारात सर्वाधिक ८ हजार १८० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. 

तूर आयात शुल्कमुक्त केल्यानंतर दर कमी होतील का? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

परंतू देशातील तूर उत्पादन घटल्याने आयातीतून तुरीची गरज पूर्ण होणार नाही.

मार्च महिन्यात १०० ते २०० रुपयांचे चढ-उतार राहू शकतात.

एप्रिलमध्ये तुरीचे दर वाढतील. तसेच गुणवत्तापूर्ण तुरीची दर ८ हजारांच्या खाली येणार नाहीत, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangola Water Crisis: सांगोल्यातील बंधारे कोरडे; जलसंकट वाढले

Farmer Compensation: बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी खलबते

Fruit Drop Subsidy Issue: संत्रा, मोसंबी, फळगळ अनुदानामध्ये गोंधळ

Fund Delay: स्थगितीला वाव देण्यासाठी निधी वर्ग करण्यास उशीर?

Maharajasva Campaign: महाराजस्व अभियान यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

SCROLL FOR NEXT