Turmeric Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Agrowon Podcast : बाजारात सध्या हळदीला काय भाव मिळतोय?

Anil Jadhao 

Market Bulletin : सोयाबीनची भावपातळी देशात स्थिर आहे. सोयाबीनच्या भावावरील दबाव कायम असून सध्या सोयाबीनला प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ४०० ते ४ हजार ७०० रुपयांचा भाव मिळत आहे. बाजारातील सोयाबीन आवक सरासरीच्या तुलनेत चांगली आहे. आज प्रक्रिया प्लांट्सनी सोयाबीनचा भाव ४ हजार ८०० ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान काढला होता.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे व्यवहार आज बंद होते. उद्यापासून बाजार सुरु होईल. सध्या देशातील सोयाबीन बाजार आंतरराष्ट्रीय बाजारातील घडोमोडींसोबत बदलताना दिसत आहे. तर देशातील बाजारातील सोयाबीनची आवक आणखी महिनाभर जास्तच राहू शकते, असा अंदाज आहे. 

कापूस भावावरील दबाव कायम असून आवकही चांगली आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच कापसाची आवक दीड लाख गाठींपेक्षा वाढली होती. बाजारात सतत १ लाख ६० हजार ते १ लाख ८० हजार गाठींच्या दरम्यान आवक होत गेली. आजही आवक सरासरीच्या तुलनेत जास्तच होती. बाजारातील आवकेचाही दरावर दबाव आहे.

कापसाचा भाव आजही ६ हजार ६०० ते ७ हजार २०० रुपयांच्या दरम्यान आहे. कापसाची बाजारातील आवक आजही १ लाख ८० हजार गाठींच्या दरम्यान राहील्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. बाजारातील आवक आणखी एक ते दीड महिना कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे कापूस भावावरील दबाव कायम राहू शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 


देशातील बाजारात सध्या हळदीचे भाव स्थिरावले आहेत. हळदीचा नवा माल पुढील काही आठवड्यांमध्ये बाजारात येईल. पुढील महिन्यापासून आवकेचा दबाव बाजारावर येऊ शकतो. यंदा हळदीची लागवड कमी आहे. त्यातच पिकाला बदलते वातावरण आणि पावसाचा फटका बसला. यामुळे उत्पादकतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

यामुळे हळदीच्या दरातील घसरण थांबली आहे. सध्या हळदीला बाजारात १२ हजार ते १४ हजारांच्या दरम्यान भाव मिळत आहे. बाजारावर आवकेचा दबाव वाढल्यानंतर दरावर आणखी काहीसा दबाव येऊ शकतो. पण यंदा हळदीचा भाव चांगला राहण्याचा अंदाज आहे. 

टोमॅटोची भावपातळी काही बाजारांमध्ये सुधारलेली दिसते. पण सरासरी भावपातळी काहीशी स्थिर दिसते. बाजारातील टोमॅटोची आवक काहीशी कमी झाली. त्याचा परिणाम बाजारावर दिसून येत आहे. सध्या टोमॅटोला प्रतिक्विंटल सरासरी १ हजार ५०० ते १ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहेत.

काही बाजारातील भाव २ हजारांवरही पोचला. टोमॅटोची आवक आणखी काही दिवस चांगली राहू शकते. बाजारातील आवक कमी झाल्यानंतर बाजारालाही आधार मिळू शकतो, असा अंदाज टोमॅटो बाजारातील व्यापारी आणि अभ्यासक व्यक्त करत आहेत. 

केळीच्या भावात मागील दोन आठवड्यांमध्ये केळीच्या भावात चांगली सुधारणा झाली. मार्गशीर्ष महिन्याच्या सुरुवातीपासूनच केळीला उठाव वाढत गेला. त्यामुळे मागील पंधरा दिवसांमध्ये केळीच्या भावात क्विंटलमागे २०० रुपयांची सुधारणा दिसून आली.  केळीचा भाव सध्या १ हजार ५०० ते २ हजारांच्या दरम्यान आहे.

बाजारातील आवक मर्यादीत असल्याने भावाला आधार मिळाला. गेल्या सहा महिन्यांपासून राज्यातील बहुतांश बाजारपेठांमध्ये केळीची चणचण आहे. आताही अनेक ठिकाणी मागणीच्या तुलनेत केळीचे उत्पादन नसल्याने ही दरवाढ आणखी महिनाभर कायम राहील, अशी शक्यता केळी उत्पादक शेतकरी तसेच व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

Fruit Crop Insurance : फळपीक विमा योजनेत नियमबाह्य सहभागाबाबत कारवाईसत्र

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

SCROLL FOR NEXT