Sugar Production Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Sugar Production : साखर उत्पादनात उत्तर प्रदेश बनला नंबर वन

Sugar Season 2023 : यंदाच्या हंगामात उत्तर प्रदेश राज्याने महाराष्ट्राला मागे टाकत साखर उत्पादनात पहिला क्रमांक पटकावला आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : यंदाच्या हंगामात उत्तर प्रदेश राज्याने महाराष्ट्राला मागे टाकत साखर उत्पादनात पहिला क्रमांक पटकावला आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत उत्तर प्रदेशात १०७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. महाराष्ट्रात १०५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले.

महाराष्ट्रात २१०, तर उत्तर प्रदेशात ११८ साखर कारखान्यांनी हंगाम सुरू केला. उत्तर प्रदेशात २८ लाख हेक्टरवर, तर महाराष्ट्रात १४ लाख हेक्टरवर उसाचे क्षेत्र होते. गेल्या वर्षी महाराष्ट्राने निर्विवाद आघाडी घेत साखर उत्पादनात पहिला क्रमांक पटकावला होता. यंदा मात्र राज्याला ही किमया साधता आली नाही. अपेक्षित पीक असूनही उत्पादनात घट झाल्याने सर्व अंदाज चुकले याचा फटका साखर उत्पादनाला बसला.

उत्तर प्रदेशात १९ लाख टन साखरेचा उपयोग इथेनॉलसाठी झाला. तर महाराष्ट्रामध्ये १५ लाख टन साखरेपासून इथेनॉल तयार करण्यात आले. गेल्या वर्षी महाराष्ट्राने साखर उत्पादनाबाबतीत गुजरातला खूपच पिछाडीवर सोडले होते. जूनपर्यंत महाराष्ट्रातील साखर कारखाने चालले.

यंदा मात्र मे ज्या पहिल्या आठवड्यातच हंगाम संपला. लवकर हंगाम संपण्याबरोबरच एकरी उत्पादनात ही घट झाल्याने याचा मोठा फटका साखर निर्मितीवर झाला. उत्तर प्रदेशने मात्र गेल्या वर्षी इतक्याच उत्पादनाचा ठेका यंदाही कायम ठेवला. जोपर्यंत महाराष्ट्राचा हंगाम सुरू होता तोपर्यंत महाराष्ट्र साखर निर्मितीत आघाडीवर होता.

महाराष्ट्राचा हंगाम संपल्यानंतर मात्र उत्तर प्रदेशने कासवगतीने हंगाम सुरू ठेवत हंगामाच्या शेवटी निर्णायक आघाडी घेतली. उत्तर प्रदेशामध्ये २०१७ नंतर अनेक नवीन कारखाने सुरू झाले, तर काहींची क्षमता वाढवण्यात आली. यामुळे साखर उत्पादनात सातत्य राहिल्याचे उत्तर प्रदेशच्या ऊस विकास मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT