Agriculture Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Agrowon Podcast : हळदीच्या भावात सुधारणा; कापूस, सोयाबीन, तूर तसेच काय आहेत हरभरा दर?

Daily Commodity Market : आज आपण सोयाबीन, कापूस, तूर, हळद आणि हरभरा पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin :

सोयाबीनमध्ये चढ उतार

आंतरराष्ट्रीय बाजारात आठवड्याच्या शेवटी म्हणजेच शुक्रवारी सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावात नरमाई आली होती. शुक्रवारी सोयाबीनच्या वायद्यांनी १० डाॅलरची पातळी पार केल्यानंतर बाजारात पुन्हा कमी होऊन ९.८१ डाॅलर प्रतिबुशेल्सवर बंद झाले होते. देशात मात्र सोयाबीनचे भाव कमीच आहेत.

प्रक्रिया प्लांट्सचे भाव ४ हजार ४०० ते ४ हजार ४५० रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान आहेत. तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला सरासरी ३ हजार ९०० ते ४ हजार १०० रुपयांचा भाव मिळाला. सोयाबीनच्या भावावरील दबाव आणखी काही आठवडे कायम राहील, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

कापूस दबावातच

मागील दोन दिवसांमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात काहीसे चढ उतार झाले. शुक्रवारी कापसाचे वायदे जवळपास दीड टक्क्याने कमी होऊन ६७.६६ सेंट प्रतिपाऊंडवर बंद झाले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव दबावात असल्याचा परिणाम देशातील बाजारावर दिसत आहे.

कापसाला आजही देशातील बाजारात सरासरी ६ हजार ८०० ते ७ हजार २०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. शुक्रवारी देशातील बाजारात कापसाची १ लाख ९२ लाख गाठी झाली होती. बाजारातील कापसाची आवक आणखी काही आठवडे कायम राहू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

हळदीच्या भावात सुधारणा

हळदीला वाढती मागणी आणि कमी आवक यामुळे हळदीच्या भावात सुधारणा दिसून आली. गेल्या तीन दिवसांमध्ये हळदीचे भाव बहुतांशी बाजारांमध्ये क्विंटलमागे ७०० ते १००० रुपयाने सुधारले आहेत. हळद पिकाचे वाढत असलेले नुकसान आणि सध्याची टंचाई याचा परिणाम बाजारावर दिसत आहे.

आज देशातील बाजारात हळदीला सरासरी १३ हजार ते १६ हजार रुपयांचा भाव मिळाला. नव्या मालाची आवक पुढील ३ आठवड्यांमध्ये सुरु होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरात काही आठवडे चढ उतार राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

तुरीचा बाजार दबावात

देशात यंदा तुरीचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवा माल बाजारात दाखल होण्याच्या आधीच बाजारात नरमाई यायला सुरुवात झाली. जून महिन्यातील उच्चांकी भावाचा विचार करता सध्याचा भाव ५ हजाराने कमी आहे. तर नोव्हेंबरमधील भावाचा विचार केला तर सध्या २ हजार ५०० रुपये कमी भाव आहे.

सध्या बाजार समित्यांमध्ये तुरीला ७ हजार ते ७ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे. नव्या तुरीमध्ये ओलावा अधिक आहे. पण नव्या मालाची आवक खूपच कमी आहे. पुढील महीनाभरात तूर आकेचा दबाव वाढायला सुरुवात होईल, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

हरभरा नरमला

हरभऱ्याचे भावही मागणी काही आठवड्यांपासून नरमले आहेत. हरभऱ्याच्या भावातील तेजी कमी झाल्यानंतर आवक कमी दिसत आहे. यंदा हरभरा उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच आयातही चांगली राहील, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

मात्र प्रत्यक्ष बाजारात किती माल येतो यानंतर बाजाराची दिशा ठरेल. सध्या देशातील बाजारात हरभरा भाव ५ हजार ते ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत. हरभरा बाजारात नवा माल दाखल होईपर्यंत चढ उतार दिसू शकतात, असे हरभरा बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT