Turmeric  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Turmeric Market : हळदीला उठाव; दरही टिकून

Turmeric Rate : बाजार समितीत यंदाच्या हंगामातील हळदीची दररोज सुमारे तीन हजार पोत्यांची आवक होत असून, मागणी चांगली असल्याने उठावही होत आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : बाजार समितीत यंदाच्या हंगामातील हळदीची दररोज सुमारे तीन हजार पोत्यांची आवक होत असून, मागणी चांगली असल्याने उठावही होत आहे. हळदीला प्रतिवारीनुसार १३ हजारांपासून ते २५ हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे. गेल्या चार दिवसांपासून हळदीचे दर टिकून आहेत. येत्या महिनाभर हळदीचे दर टिकून राहतील, असा अंदाज हळद उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.

सांगली जिल्ह्यासह सातारा जिल्ह्यातील हळद काढणी सुरू झाली आहे. अद्यापही हळद काढणीला फारशी गती आली नाही. या दोन्ही जिल्ह्यांतील हळद शुक्रवार (ता. २) पासून नवी हळद मार्केटमध्ये सौद्यास येऊ लागली आहे. दररोज सुमारे तीन हजार पोती (एक पोते ५० किलोचे) आवक होत आहे. यंदाच्या हंगामात हळदीला चांगले दर मिळत असल्याने हळद उत्पादक शेतकऱ्यांना दिसाला मिळाला आहे.

वास्तविक पाहता, गतवर्षी हळद हंगामाच्या प्रारंभी प्रतवारीनुसार हळदीला प्रति क्विंटल ७ हजार ते ८ हजार रुपये असा दर मिळाला. मात्र कमी पाऊस असून देखील शेतकऱ्यांनी काटेकोर नियोजन करत दर्जेदार हळदीचे उत्पादन घेतले आहे. सध्या सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील हळद विक्रीला येत आहे.

हिंगोली, वसमत या ठिकाणीची हळद पुढच्या महिन्यात विक्रीला येईल. तर जळगाव येथील हळद पुढच्या आठवड्यापासून सौद्याला येणार आहे. हळद हंगामाच्या प्रारंभापासून हळदीला दर टिकून राहिले आहेत. येत्या महिनाभर हळदीच्या दरात फारसा चढ-उतार होण्याची शक्यता नाही.

प्रतवारीनुसार हळदीचे दर (प्रति क्विंटल)

कणी...१३ हजार ते १४ हजार

मध्यम...१६ हजार ते १७ हजार

लगडी...२२ हजार ते २५ हजार

हळदीचा यंदा हंगाम सुरू झाला आहे. सध्या स्थानिक हळद विक्रीस येत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा दर चांगले आहेत. येत्या महिनाभर दर टिकून राहतील असा अंदाज आहे.
- गोपाळ मर्दा, हळद व्यापारी, सांगली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabbage Farming: कोबी पिकात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT