Nagar News : येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून तुरीचे दर प्रति क्विंटल दहा हजार रुपयांपर्यंत स्थिर आहेत. येथे दररोज पन्नास क्विंटलपर्यंत आवक होत असली तरी आवकेत कमीजास्त पणा येत आहे. यंदा तूर पिकांसाठी वातावरण पोषण असल्याने नगरसह राज्यात तुरीची बऱ्यापैकी लागवड झाली आहे.
नगर येथील बाजार समितीत नगर जिल्ह्यासह शेजारच्या पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, आदी भागातून तूर विक्रीला येत असते. सध्या येथे तुरीला ७ हजार ते १० हजार व सरासरी ८५०० हजार रुपयांचा दर मिळत आहे. मध्यंतरी तुरीची दर साडेदहा अकरा हजारांवर गेला होता. मात्र आता अलीकडच्या काही दिवसांपासून तुरीचा दर दहा हजार रुपये क्विंटलपर्यंत स्थिर आहे.
मागील महिन्यात साधारण ८ जुलैला तुरीची ३७ क्विंटलची आवक होऊन ९,५०० ते १०,५०० व सरासरी १०,००० हजारांचा दर मिळाला. १२ जुलैला ५६ क्विंटलची आवक होऊन ९,५०० ते १०,५०० व सरासरी १०,००० हजाराचा दर मिळाला. १८ जुलैला १० क्विंटलची आवक होऊन ९,१०० ते १०,३०० व सरासरी ९,५०० हजारांचा दर मिळाला.
२७ जुलैला १२ क्विंटलची आवक होऊन ८,५०० ते १०,३०० व सरासरी ९,४०० हजारांचा दर मिळाला. गेल्या काही दिवसांतील बाजाराचा विचार केला तर तुरीचे दर १० हजारांपर्यंत स्थिर आहेत.
यंदा पावसाळी वातावरण चांगले असून तूर पिकाला पोषक असल्याने तुरीला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत राज्यात १२ लाख ४ हजार २०८ म्हणजे सरासरीच्या ११२ टक्के पेरणी झाली आहे. गेल्यावर्षीपेक्षा यंदा आतापर्यंत जवळपास पावणेदोन लाख हेक्टरवर तुरीची अधिक पेरणी झाली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.