Tur Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Rate : तुरीचे दर हमीभावाच्या आत

Tur Market : नवीन तूर बाजारात यायला लागताच सर्वत्र दरांमध्ये घसरण सुरू झाली. आता तर तुरीचा दर हमीभावाच्या (७५५०) आत आला आहे. दरांमधील या घसरणीने तूर उत्पादकांच्या छातीत धडकी भरवली आहे.

 गोपाल हागे

Akola News : नवीन तूर बाजारात यायला लागताच सर्वत्र दरांमध्ये घसरण सुरू झाली. आता तर तुरीचा दर हमीभावाच्या (७५५०) आत आला आहे. दरांमधील या घसरणीने तूर उत्पादकांच्या छातीत धडकी भरवली आहे. घसरणीचा आलेख कायम असून आवक वाढल्यानंतर दर काय राहतील याची चिंता भेडसावत आहे.

यंदाच्या खरीप हंगामातील तुरीची काढणी सुरू झाली आहे. तुरीचे उत्पादन तुलनेने कमीच आहे. काही ठिकाणी एकरी तीन क्विंटलपासून पाच क्विंटलपर्यंत उतारा येत आहे. त्यातही ‘मुकण’चे प्रमाण अधिक आहे. ही तूर बाजारात विक्रीला येऊ लागताच दर घसरण वाढली. साधारणपणे महिनाभरापूर्वी तुरीचा अकोल्यात कमाल दर १० हजारांवर होता. आता हाच दर साडेआठ हजारांच्या आत आला.

प्रामुख्याने किमान दरात मोठी घट आलेली आहे. महिन्यापूर्वी नऊ हजारांपर्यंत असलेला किमान दर आता सहा हजारांच्या आत पोहोचला. तुरीच्या किमान दरात तीन हजारांची मोठी घसरण झाल्याचे दिसून येत आहे. बाजारात आवक वाढत आहे. दक्षिणेत तुरीचे पीक चांगले असून तेथील प्रचंड आवकेमुळे बाजारात माल उपलब्धता वाढली. याचा स्थानिक बाजारातील दरांवरही परिणाम झाला, असे व्यापारी सूत्राने सांगितले. सोबतच तुरीमध्ये आर्द्रता सुद्धा असून त्यामुळे दर कमी मिळत असल्याचा दावा केला जात आहे.

हमीभाव खरेदीची गरज

शासनाने तुरीला सन २०२४-२५ या वर्षासाठी ७५५० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केलेला आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच तुरीचा दर हमीभावाच्या आत पोचल्याने शासनाने तातडीने शासकीय खरेदीची प्रक्रिया सुरू करण्याची मागणी होऊ लागली आहे. शासकीय केंद्र सुरू झाल्यास त्याचा दरांवर दबाव होऊन दर स्थिर होण्यास मदत होऊ शकते, असे जाणकारांचे म्हणणे आहे. खरेदी सुरू करण्याच्या हालचाली न झाल्यास तुरीचा किमान दर आणखी घसरू शकतो, अशी भीतीसुद्धा व्यक्त केली जात आहे.

अकोला बाजार समितीतील आठवडाभरातील दर

तारीख किमान कमाल सरासरी

२५ डिसेंबर ५८०० ८२८५ ७३००

२ जानेवारी ५९०० ८३४५ ७१९५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Crisis : दुष्काळी संकट तंत्रज्ञानाच्या पलीकडे; दीर्घकालीन नियोजनाची गरज; कुलगुरू डॉ. विलास खर्चे

Ahilyanagar Crop Damage : अहिल्यानगर जिल्ह्यात पिकांचे पंचनामे सुरू

Maharashtra Agriculture : संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार; महसूलमंत्री बावनकुळे

Sugarcane Price Dispute : ऊसदराचा निर्णय होईपर्यंत कारखाने बंद ठेवा;‘स्वाभिमानी’चा इशारा

Banana Crop Insurance : केळी विमाधारकांच्या परताव्याची मागणी

SCROLL FOR NEXT