Market Update Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Agrowon Podcast : तुरीचा बाजार टिकून; कापूस, सोयाबीन, मका तसेच काय आहेत आले दर ?

Agriculture Commodity Market : आज आपण सोयाबीन, कापूस, आले, मका आणि तूर पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin

सोयाबीन दबावातच

सोयाबीनच्या भावावरील दबाव कायम आहे. प्रक्रिया प्लांट्सने सोयाबीनच्या भावातही ५० रुपयांपर्यंत घट केली आहे. हमीभावाने सोयाबीन खरेदीची गतीही खूपच कमी आहे. खरेदी केंद्रेही कमी आहेत. तर खुल्या बाजारात सोयाबीनचा सरासरी भाव प्रतिक्विंटल ४ हजार ते ४ हजार २०० रुपयांच्या दरम्यान आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीन आणि सोयापेंडच्या वायद्यांमध्ये चढ उतार सुरुच आहेत. आज सोयाबीन ९.९० डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. सोयाबीन बाजारातील ही स्थिती कायम राहण्याचा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

कापूस स्थिर

कापसाच्या भावात पुन्हा चढ उतार सुरु झाले. पुढे सुताला उठाव कमी असल्याचा दबाव कापसाच्या भावावर येत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. बाजारातील आवकही वाढली. रोज जवळपास १ लाख ८० ते १ लाख ९० हजार गाठींच्या दरम्यान बाजारात आवक होत आहे. मात्र बाजार टिकून आहे. देशातील बाजारात कापसाचा आज सरासरी भाव ६ हजार ९०० ते ७ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान आहे. कापसाची आवक आणखी काही आठवडे कायम राहू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

आले भाव पडले

राज्यात यंदा आले पिकाचे क्षेत्र वाढले होते. त्यामुळे आले उत्पादनात यंदा वाढ होईल, असा अंदाज आधिपासून व्यक्त केला जात होता. मध्यंतरी आले पिकाला पावसाचा फटका बसला. मात्र लागवड जास्त असल्याने आल्याचे भाव कमी कमी होत गेले. वर्षभरापुर्वी १२ हजारांवर पोचलेले आल्याचे भाव सध्या पडले आहेत. बाजारातील आवक वाढल्यानंतर दरावर दबाव वाढत गेला. सध्या आल्याला बाजारात प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ते ६ हजारांचा भाव मिळत आहे. आल्याच्या भावावरील दबाव काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे.

मक्याचे दर टिकून

बाजारातील मक्याची आवक स्थिरावली आहे. तर दुसरीकडे मक्यामधील ओलावा कमी झाला. त्यामुळे मक्याच्या भावात मागील ८ दिवसांच्या काहिशी सुधारणा दिसून येत आहे. मक्याचा सरासरी भाव राज्यात सध्या २ हजार १०० ते २ हजार २०० रुपये दिसून येत आहे. मात्र ओलावा अधिक असलेल्या मालाला आजही कमी भाव मिळत आहे. त्यामुळे किमान भावपातळी आजही १८०० रुपये दिसत आहे. यापुढील काळात मक्याची आवक स्थिर राहण्याची शक्यता आहे. तर मक्याला उठाव चांगला आहे. त्यामुळे मक्याचे बाजारभाव टिकून राहतील, असा अंदाज मका बाजारतील अभ्यासकांनी व्यक्त केला.

तूर टिकून

देशात तुरीची उपलब्धता कमीच आहे. मात्र उपलब्ध साठा आणि आयात तुरीवर सध्या गरज भागवली जात आहे. त्यामुळे दरात चढ उतार सुरु आहेत. यंदा तुरीची लागवड जवळपास १० टक्क्यांनी वाढली. सध्या अनेक भागात पिकाची स्थितीही चांगली आहे. मात्र यापुढच्या काळात हवामान कसे राहते यावर उत्पादन अवलंबून राहील. सध्या बाजारात तुरीला सरासरी ९ हजार ते १० हजारांचा भाव मिळत आहे. तुरीच्या भावातील चढ उतार कायम राहतील, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Rainfall: पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

MKCL Investment: ‘एमकेसीएल’ने सरकारमध्ये गुंतवणूक करावी; शरद पवार यांची अपेक्षा

Market License Cancellation: पणन संचालकांचा खासगी बाजारांवर कारवाईचा धडाका; ‘रामेश्वर, ‘कसमादे’, ‘जय गजानन’ बाजारांचे परवाने रद्द

Indigenous Livestock Breeds: सोळा नव्या देशी पशुजातींना मान्यता

Agro-Service Federation's Protest: प्रस्तावित आकृतिबंधाविरोधात कृषी सेवा महासंघाचे आंदोलन

SCROLL FOR NEXT