Tomato rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tomato Rate : चिपळूणमध्ये टोमॅटो १२० रुपये किलो

Tomato Market Update : काही आठवडेआधी स्थानिक बाजारात २० ते ३० रुपये किलोने मिळणारा टोमॅटो आता १२० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे.

Team Agrowon

Ratnagiri News : काही आठवडेआधी स्थानिक बाजारात २० ते ३० रुपये किलोने मिळणारा टोमॅटो आता १२० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. बाजारात आवक कमी झाल्याने टोमॅटो दराने उच्चांक गाठला असून, अन्य भाज्यांच्या दरातही सुधारणा झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून भाज्यांच्या दरात चांगली सुधारणा झाली आहे. चिपळूण बाजारपेठेत सध्या टोमॅटो शंभरी पार करत भाव खात आहे. येथील बाजारपेठेत पाटण, कराड, पुणे, सांगली, मिरज, आष्टा, सातारा, कोल्हापूर येथून भाज्यांची आवक होते. सध्या घाटमाथ्यावर पावसाचे प्रमाण कमी असल्याने त्याचा फटका भाजी उत्पादनाला बसला आहे.

चिपळूण बाजारपेठेत आवक कमी झाल्याने गेल्या महिन्यापासून भाज्यांच्या दरात सुधारणा झाली आहे. साधारण ४० ते ६० टक्के तर काही ठिकाणी भाज्यांचे दर शंभर टक्के वाढले आहेत.

सध्या येथील बाजारपेठेत टोमॅटो १२० रुपये किलो, वांगी ४० रुपये, भेंडी ४० रुपये, कोबी ४० रुपये, फ्लॉवर ८० रुपये, शिमला मिरची ८० रुपये, गवार ६० ते ८० रुपये, फरसबी १०० रुपये, दोडकी ६० रुपये, कारली ६० रुपये, आले २०० ते २४० रुपये, मिरची १०० ते १२० रुपये, तोंडली ८० ते १०० रुपये, घेवडा ६० ते ८० रुपये, काकडी ४० रुपये, गाजर ८० रुपये, बीट ८० रुपये किलोने विक्री होत आहे.

कोथिंबीर ३० रुपये जुडी, मेथी ३० रुपये जुडी, पालक २० रुपये जुडी, अन्य पालेभाज्या १० रुपये जुडी, शेपू ५० रुपयांना दोन जुडी, कांदा ३० ते ३५ रुपये किलो, बटाटे ३० ते ३६ रुपये किलो तर लसूण २०० रूपये किलोने विक्री होत आहे. आवक घटल्याने भाज्यांच्या दरात सुधारणा झाल्याची माहिती स्थानिक भाजी व्यावसायिकांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT