Onion Seeds Crop Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Onion Seed Shortage: कांदा बियाण्यांची यंदा तुटवडा भासण्याची शक्यता

Onion Seed Production: गत दोन वर्षांत कांदा बियाण्यांना मिळालेल्या अल्प दरांमुळे बियाणे उत्पादनात घट झाली आहे. यंदा ३० टक्क्यांनी कमी बियाणे उपलब्ध असल्याने कांदा पिकाच्या हंगामात तुटवड्याचा धोका निर्माण झाला आहे.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Ahilyanagar News: दोन वर्षांपूर्वी तसेच गत वर्षी कांदा बियाण्यांना मातीमोल दर मिळाल्याने बियाणे उत्पादनातील कल कमी झाला आहे. त्याचा परिणाम यंदा कांदा बियाणे उपलब्धतेवर होताना दिसत आहे. दर वर्षीच्या तुलनेत यंदा तीस टक्के बियाणे उत्पादन कमी झाल्याने बियाणांच्या तुटवड्याला सामोरे लागणार असल्याचा कांदा उत्पादकांचा अंदाज आहे.

अहिल्यानगर, नाशिक, पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगरसह मराठवाडा, विदर्भातील अनेक जिल्ह्यांत कांदा उत्पादन घेतले जाते. अनेक शेतकरी स्वतः तयार केलेले बियाणेच वापरतात, शिवाय अन्य शेतकऱ्यांनाही विक्री करतात. दोन वर्षांपूर्वी शेतकरी तसेच बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात बियाणे उत्पादन केले होते.

यंदा नैसर्गिक वातावरणातील परिणामामुळे बियाणांच्या उत्पादनातही घट झाल्याचे बीजोत्पादन घेणारे शेतकरी सांगतात. बियाणे चढ्या दराने घ्यावे लागेल. शिवाय बियाणांची गुणवत्ता कमी, बियाणात भेसळ, जुने बियाणे असल्यास उगवण क्षमता कमी अशा अडचणींना सामोरे जावे लागणार असल्याने बियाणे खरेदी करताना दक्ष राहावे लागणार असल्याचे कांदा पीक अभ्यासक वैभव गोल्हार यांनी सांगितले. महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून दरवर्षी कांदा बियाण्यांचे उत्पादन घेतले जाते.

सध्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात कांदा बियाणांची विक्री सुरू आहे. मात्र यंदा बियाण्यांच्या उत्पादनात घट झाल्याचे दिसून येत आहे. विद्यापीठाने गेल्या वर्षी (२०२३-२४) १४ टन बियाणे उत्पादित केले होते. यंदा विद्यापीठाकडे ११ टन बियाणे उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले.

दोन वर्षांपूर्वी कांदा बियाणे उत्पादन अधिक झाले होते. त्यामुळे बियाणे मातीमोल किमतीने विकावे लागले. त्यामुळे गतवर्षी व यंदा कांदा बियाण्यांच्या उत्पादनाकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली. शिवाय बियाणांचे उत्पादनही ३० टक्क्यांनी कमी झाले. त्यामुळे बियाणे टंचाईला सामोरे जावे लागू शकते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना भेसळयुक्त बियाणांपासून सावध राहावे लागणार आहे.
वैभव गोल्हार, कांदा उत्पादक शेतकरी, बाबी, ता. आष्टी ९४२०४१२९००
आम्ही दर वर्षी कांदा बिजोत्पादन घेतो. डोंगरांच्या बाजूला असलेल्या स्वतंत्र शेतजमिनीत बीजोत्पादन घेतल्याने बियाणे दर्जेदार तयार झाले आहे. मात्र दर वर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादन कमी निघाले आहे. यंदा कांदा बियाण्याला अधिक मागणी असल्याचे दिसत आहे.
बंडू पाठक, कांदा बीजोत्पादन शेतकरी, सातवड (ता. पाथर्डी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Return : मॉन्सूनची महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून माघार

Seasonal Paisewari: छत्रपती संभाजीनगर, जालन्याची हंगामी पैसेवारी ५० पैशांच्या आत

Beed Water Planning: बीडमध्ये पुढील दहा महिन्यांच्या पाणी, चाऱ्याचे नियोजन करा : जी. श्रीकांत

Rabi Crop Variety Selection: रब्बी पिकांसाठी वाण निवड महत्त्वाची

CJP Protest: जेलमध्ये टाकले, तरी आम्ही पुन्हा येऊ : दिपके

SCROLL FOR NEXT