Betel Leaf Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Betel Leaf : खाऊच्या पानास चांगली मागणी; दरही टिकून

Betel Leaf Market : राज्यातील पानांच्या पेठांमध्ये खाऊच्या पानांना मागणी वाढली असून उठावही चांगला होत आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : राज्यातील पानांच्या पेठांमध्ये खाऊच्या पानांना मागणी वाढली असून उठावही चांगला होत आहे. त्यामुळे बाजारपेठेत पानांचे दर टिकून आहेत. सध्या पानांना प्रतिडागाला (एक डागात १२ हजार पाने) ६०० ते ५५०० रुपये असा दर मिळत आहे. त्यामुळे पान उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

मिरज तालुक्याच्या पूर्व भागातील मालगाव, बेडग, आरग, नरवाड, या भागात पान मळ्यांचे क्षेत्र जास्त होते. मात्र गेल्या काही वर्षांत कुशल कामगारांची कमतरता आणि नैसर्गिक संकटामुळे मळ्यांचे क्षेत्र कमी झाले. मात्र शेतकऱ्यांनी बदलते वातावरण, नैसर्गिक आपत्ती अशा प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांनी पानमळे टिकवले आहेत. यावर्षी पानांच्या विक्रीचा हंगाम सुरू झाल्यानंतर पानांच्या पेठांमध्ये खाऊच्या पानांची मागणी वाढली आहे. त्यामुळे हंगामाच्या सुरवातीपासूनच पानांना चांगले दर मिळू लागले आहेत.

महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक, रत्नागिरी, लातूर, धाराशिव, पंढरपूर यासह गुजरात, कर्नाटकात सांगली जिल्ह्यातील पानांची विक्री होते. या पानांच्या पेठांतून पानांची मागणी हळूहळू वाढू लागली आहे. त्यामुळे शेतकरी बाजारपेठेच्या मागणीनुसार पानांची खुडा करण्यात व्यस्त आहेत.

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात अशी दोन वेळा पानांच्या दरात वाढ झाली आहे. गुजरातसह अन्य राज्यात जुलैमध्ये फाफडा पानांना अधिक मागणी असते. त्यामुळे जुलैमध्ये फाफड्याच्या पानांच्या दरात वाढ होईल, असा अंदाज आहे.

गतवर्षी कमी पाऊस झाल्याने पानांच्या उत्पादनात ३० टक्क्यांनी घट झाली होती. परंतु, बाजारात परराज्यातील पानांची आवक झाली असल्याने पानांना अपेक्षित दर मिळाले नव्हते. मात्र, पानांच्या पेठेत पानांच्या दरात तेजी-मंदी होती. दर टिकून नव्हते. त्यामुळे पान उत्पादकांना काही प्रमाणात आर्थिक फटका बसला.

सध्या सण-उत्सव नसतानाही पानांचे दर टिकून असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जुलैमध्ये महाराष्ट्र बेंदूर आणि ऑगस्टमध्ये श्रावण महिना सुरू होत आहे. त्यामुळे या दरम्यान, पानांच्या मागणीत वाढ होणार असून दरही वाढतील, अशी शक्यता पान उत्पादकांनी व्यक्त केली आहे.

खाऊच्या पानांचे दर (रुपये) (एका डागात १२ हजार पाने)

मे ः

कळी - १००० ते ४५००

जून ः

कळी - १२०० ते ५५००

फाफडा - २५०० ते ५०००

हक्कल - ६०० ते १३००

यंदाचा पानांचा हंगाम दरामुळे चांगला सुरू झाला आहे. गेल्या महिन्यापासून दर टिकून आहेत. पोषक वातावरण असल्याने उत्पादनही अपेक्षित मिळत आहे.
- भाऊसो नागरगोजे, पान उत्पादक, नरवाड, ता. मिरज.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangli DCC Bank: सांगली जिल्हा बँक निवडणुकीसाठी २४४५ मतदार

Sericulture Farming : पावसाने इतर पिकं गेली, तुती-रेशीम ठरलं आधार; ४ एकरांतून लाखोंचं उत्पन्न | Agrowon

Veterinary Staff Shortage: राधानगरीत रिक्त पदांमुळे जनावरांच्या उपचारात अडचणी

Rain Deficit Impact: पावसाने केळी लागवडीला ‘ब्रेक’

Akola Farmer Loan Waiver: अकोला जिल्ह्यातील ११ हजार ५० शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर

SCROLL FOR NEXT