Market Update Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Agrowon Podcast: तुरीचे भाव हमीभावापेक्षा कमीच; आले, पपई, कापूस तसेच काय आहेत सोयाबीन भाव?

Daily Commodity Rates: आज आपण तूर, पपई, आले, सोयाबीन आणि कापूस बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin:

तूर बाजार दबावात

राज्यासह देशातील बाजारात सध्या तुरीची आवक वाढत आहे. तसेच कडधान्य आयातीविषयी सरकारचे धोरण अनिश्चित आहे. त्याचाही दबाव बाजारावर दिसत आहे. तुरीची बाजारातील आवक वाढ असल्याने दरातही काहीसे चढ उतार सुरु आहेत. सध्या तुरीला सरासरी ६ हजार ७०० हजार ते ७ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान गुणवत्ता आणि वाणानुसार भाव मिळत आहे. बाजारातील आवक आणखी महीनाभर कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे तुरीचा बाजार काही आठवडे तरी हमीभावाच्या खाली राहू शकतो, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

आल्याचे भाव दबावातच

राज्यातील सर्वच बाजारांमध्ये आल्याची आवक वाढली आहे. त्याचा परिणाम आल्याच्या दरावर दिसून येत आहे. सध्या आल्याला उठाव असला तरी वाढत्या आवकेमुळे आल्याचे भाव मागील दोन महिन्यात निम्म्यापेक्षा कमी झाले आहेत. सध्या बाजारात आल्याला प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ते ३ हजारांच्या दरम्यान भाव मिळत आहे. यंदा आल्याच्या उत्पादनात वाढल्याचेही शेतकरी आणि व्यापारी सांगत आहेत. आल्याची बाजारातील आवक काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दरातही काहीसे चढ उतार दिसतील, असा अंदाज आले बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

पपईला चांगला उठाव

राज्यातील पपईला सध्या चांगली मागणी आहे. त्यामुळे पपईच्या भावातील तेजी टिकून आहे. पपईचे वाढलेले भाव मागील काही दिवसांपासून स्थिर आहेत. वाढती उष्णता आणि रमजान सणामुळे पपईला चांगला उठाव आहे. राज्यातील पपई सध्या देशभरात जात आहे. त्यामुळे पपईला सध्या १७०० ते २ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. यंदा पपईची लागवड सरासरीपेक्षा कमीच होती. त्यामुळे आवकही मर्यादीत आहे. पपईचा बाजारभाव आणखी काही आठवडे कायम राहू शकतो,  असा अंदाज पपई बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.   

सोयाबीनचे भाव टिकून

सोयाबीनच्या भावातील सुधारणा कायम आहे. प्रक्रिया प्लांट्सनी आजही सोयाबीन खरेदीच्या भाव ४ हजार ५०० ते ४ हजार ७५० रुपयांच्या दरम्यान कायम ठेवले होते. बाजार समित्यांमधील सोयाबीनचे भावही आज काहीसे स्थिर दिसले. आजही सोयाबीन ४ हजार १०० ते ४ हजार ४०० रुपयाने विकले गेले. सोयाबीनची बाजारातील आवक कमी होत आहे. तर दुसरीकडे मागणी चांगली आहे. त्यामुळे बाजारात सोयाबीनच्या भावातील चढ उतार कायम राहतील, असे सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी सांगितले. 

कापूस दरात वाढ

कापसाची बाजारातील आवक कमीच आहे. तर उद्योगांची कापसाला असलेली मागणी आजही चांगली. सीसीआयची कापूस विक्रीही चढ दरात होत आहे. याचा आधार कापूस दराला मिळत आहे. त्यामुळे दरात सुधारणा दिसत आहे. आजही कापसाच्या भावातील सुधारणा कायम होती. कापसाचा भाव सरासरी ७ हजार १०० ते ७  हजार ६०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. बाजारातील कापसाची आवक पुढील आठवड्यापासून आणखी कमी होत जाईल. त्यामुळे कापसाच्या दरालाही आधार मिळेल, असे कापूस बाजारातील अभ्यासकांनी सांगितले. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT