Banana  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Banana Rate : खानदेशात केळी दरात घट सुरूच

Banana Market : सध्या कमाल दर २१५० रुपये प्रतिक्विंटल आहे. तर किमान दर १४५० ते १९०० रुपये प्रतिक्विंटल आहेत.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात केळी दरात मागील १८ ते २० दिवसांत क्विंटलमागे १२०० ते १३०० रुपयांची घट झाली आहे. सध्या कमाल दर २१५० रुपये प्रतिक्विंटल आहे. तर किमान दर १४५० ते १९०० रुपये प्रतिक्विंटल आहेत.

केळीची गुणवत्ता, दर्जा लक्षात घेऊन केळीला दर दिले जात आहेत. २१५० रुपये दर अत्यल्प शेतकऱ्यांना सध्या मिळत आहे. खानदेशात केळी आवकेत कुठलीही वाढ मागील सात ते आठ दिवसांत झालेली नाही.

परंतु दरात मात्र घट झाली आहे. मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील बाजारात केळीला लिलावात कमाल २००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर मिळत आहेत. तेथे केळीची आवक घटली आहे. फारशी दर्जेदार केळी तेथे लिलावात येत नसल्याची स्थिती आहे.

दोन ते १० टन क्षमतेच्या वाहनांतून तेथे केळी येत आहेत. तेथे सध्या प्रतिदिन सरासरी ३० ट्रक (एक ट्रक १० टन क्षमता) केळीची आवक होत आहे. परंतु दरात तेथे सतत घट झाली आहे. बऱ्हाणपुरातील लिलावानुसार खानदेशात केळीची थेट किंवा शिवार खरेदी केली जाते.

खानदेशात सध्या रोज ५० ते ५५ ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) आवक होत आहे. आवकेत पुढील आठवड्यात आणखी घट होईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT