Sugar Export Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Sugar Export : केंद्राकडून साखर निर्यात परवानगीला टाळाटाळ

Central Government : ही केंद्र सरकार साखर निर्यातीला परवानगी देण्यापेक्षा इथेनॉलकडेच साखर वळवण्यासाठी प्रयत्न करत आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : यंदा शिल्लक साखर जादा असल्याने केंद्र सरकारने निर्यातीस परवानगी द्यावी, अशी मागणी साखर उद्योगाकडून सातत्याने करण्यात येत असली तरी अजूनही केंद्र सरकार साखर निर्यातीला परवानगी देण्यापेक्षा इथेनॉलकडेच साखर वळवण्यासाठी प्रयत्न करत आहे.

गेल्या वर्षी पाऊसमान कमी असल्याने काही भागात ऊस पर्यायाने साखर उत्पादनाची शक्यता कमी असल्याची भीती केंद्राला वाटत आहे. यामुळेच केंद्र तातडीने निर्यातीला परवानगी देण्याची शक्यता धूसर असल्याचे केंद्रीय सूत्रांनी सांगितले.

देशाचा साखर हंगाम सुरू होण्यास केवळ एक महिन्याचा कालावधी उरला आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्राने तातडीने निर्यातीची परवानगी द्यावी, अशी मागणी साखर उद्योगाची आहे. तथापि केंद्र निर्यातीपेक्षा इथेनॉल उत्पादनाकडेच जास्त लक्ष देणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. याबाबतचा निर्णय केंद्र येत्या पंधरा दिवसात जाहीर करू शकते, अशी शक्यता आहे. याबरोबरच इथेनॉलच्या किमती वाढवण्याबाबतही केंद्रीय पातळीवर चर्चा सुरू असून हा निर्णय घेऊन इथेनॉल निर्मितीला अधिक प्राधान्य देण्याचा विचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

केंद्र सरकारने पंधरवड्यापूर्वी इथेनॉल निर्मितीवरील सर्व अटी काढून टाकून साखर उद्योगाला दिलासा दिला आहे. याबरोबरच तीस लाख टनांपर्यंत निर्यातीला परवानगी दिल्यास यंदाची जादा साखर लवकर निर्गत होऊन त्याचा फायदा साखर उद्योगाला होईल, असे साखर उद्योगाचे म्हणणे आहे. केंद्रीय स्तरावरून मात्र याकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे चित्र असल्याची माहिती केंद्रातील सूत्रांनी दिली. अजून हंगाम सुरू झाला नसल्याने निर्यातीचा निर्णय काही काळ प्रलंबित राहू शकतो, असेही सांगण्यात आले.

केंद्राच्या वतीने इथेनॉल मिश्रणाचे अपेक्षित ध्येय गाठण्यासाठी साखर उद्योगातून तयार होणाऱ्या इथेनॉलबरोबरच मका व अन्नधान्यावरील इथेनॉल प्रकल्पांनाही बळ देण्याचे प्रयत्न केंद्राने गेल्या महिन्यापासून नव्याने सुरू केले आहेत. अनुदानित तांदळाच्या वापराबरोबरच मका लागवडीला प्रोत्साहन देण्याचे कामही सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर साखर निर्यातीचा निर्णय मात्र रखडण्याची शक्यता आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात दरात तेजीची शक्यता

निर्यातीबरोबर गेल्या अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या साखरेच्या किमान विक्री मूल्यात (एमएसपी) वाढ करण्याची मागणीही उद्योगाकडून होत आहे. सध्या तरी मागणीबाबत शांतता आहे. केंद्राने याबाबत तशी भूमिका स्पष्ट केली नाही. ब्राझीलमध्ये आगीने उसाचे नुकसान झाल्याने ब्राझीलच्या साखर उत्पादनात घट अपेक्षित मानली जात आहे, या पार्श्‍वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत काही प्रमाणात साखरेच्या दरात तेजी येऊ शकते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Re-Sowing: दुबार पेरणीसाठी सरकार शेतकऱ्यांना मदत देणार, राज्य सरकारचा निर्णय, मंत्री बावनकुळेंची माहिती

Pandharpur Cycle Wari: पंढरपुरात रंगली ४ हजार सायकलस्वारांची आगळीवेगळी ‘सायकल वारी’

Kharif Sowing Delayed: पावसाच्या खंडामुळे खरिपाच्या पेरण्यांना ‘ब्रेक’

Farm Loan Waiver Scheme: लाखभर शेतकऱ्यांचा कोरा होणार ७/१२

Re Sowing Kharif: दुबार पेरणी करताना कोणती काळजी घ्यावी?

SCROLL FOR NEXT