Fertilizer Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Fertilizer : शेतकऱ्यांना आधार खताच्या ‘बफर स्टॉक’चा

खरीप हंगामात सध्या युरियाची मोठी टंचाई जाणवत आहे. शेतकरी यामुळे त्रस्त झाले आहेत. गेले काही दिवस सुरू असलेला पाऊस सध्या थांबलेला आहे. त्यामुळे शेतीची कामे पुन्हा सुरू झाली असून पिवळ्या पडलेल्या पिकांना युरियाची खतमात्रा शेतकरी देऊ लागले.

टीम ॲग्रोवन

अकोला ः जिल्‍ह्यात गेल्या काही दिवसांपासून रासायनिक खतांची टंचाई (Fertilizer Shortage) भेडसावत आहे. रेल्वे रॅक (Railway Rack For Fertilizer) लागलेल्या नसल्याने खतपुरवठा (Fertilizer Supply) ठप्प पडलेला आहे. अशा स्थितीत आता डीएपी, युरियाची मागणी (Urea Demand) वाढलेली आहे. त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाल दातकर अप्पर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांची भेट घेत बफर स्टॉक खुला करण्याची मागणी केली. याची दखल घेत जिल्हा प्रशासनाने तातडीने ३२० टन खत खुले करण्याची सूचना कृषी विभागाला केली आहे.

खरीप हंगामात सध्या युरियाची मोठी टंचाई जाणवत आहे. शेतकरी यामुळे त्रस्त झाले आहेत. गेले काही दिवस सुरू असलेला पाऊस सध्या थांबलेला आहे. त्यामुळे शेतीची कामे पुन्हा सुरू झाली असून पिवळ्या पडलेल्या पिकांना युरियाची खतमात्रा शेतकरी देऊ लागले.

बाजारात युरियाची टंचाई असल्याने शेतकऱ्यांची पायपीट सुरू आहे. याची दखल घेत शिवसेनेने अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन तातडीने खते उपलब्ध करून देण्याची मागणी केली. जिल्ह्यात ६६० टन खताचा बफर स्टॉक आहे. अडचणीच्या काळात हे खत वापरले जाते. सध्या गरज असल्याने हा साठा खुला करण्याची मागणी करण्यात आली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Sowing: खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात भात पेरणी सुरू

Irrigation Water Crisis: इंदापुरात शेतकरी पाण्यासाठी आक्रमक

Wildlife Conservation: पाच एकर शेती वन्यजीवांसाठी राखीव

Ashadhi Wari 2026: तुकोबारायांच्या पालखीचे सात जुलैला प्रस्थान

Farm Loan Waiver: कर्जमुक्ती नव्हे, कर्जवसुली योजना

SCROLL FOR NEXT