Sugar Production Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Sugar Production : राज्यात पुढील वर्षी उसासह साखर उत्पादन वाढणार

पुढील हंगामात खोडव्याचे प्रमाण २७ टक्क्यांवर येण्याची शक्यता आहे. खोडवा उसापेक्षा लावण उसाचे उत्पादन जास्त असल्याने ऊस व साखर उत्पादनात वाढ होईल, असा कयास आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Sugar Season Update कोल्हापूर ः यंदा राज्यात खोडवा उसाचे प्रमाण अधिक असल्याने उसाच्या व साखरेच्या (Sugar) प्रमाणातही घट झाली. येणाऱ्या हंगामात (२०२३-२४) नव्या लागवडी (Sugarcane Cultivation) (लावण) वाढणार असल्याने पुढील हंगामात राज्यातील ऊस व साखर दोन्हींचेही उत्पादन (Sugar Production) वाढण्याची शक्यता राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने वर्तवली आहे.

यंदा राज्यात खोडव्याचे प्रमाण सुमारे ४५ टक्के होते. याचा प्रतिकूल परिणाम ऊस व साखर उत्पादनावर होत आहे. पुढील वर्षी मात्र हे चित्र बदलेल, अशी अपेक्षा महासंघाला आहे.

पुढील हंगामात खोडव्याचे प्रमाण २७ टक्क्यांवर येण्याची शक्यता आहे. खोडवा उसापेक्षा लावण उसाचे उत्पादन जास्त असल्याने ऊस व साखर उत्पादनात वाढ होईल, असा कयास आहे.

अमेरिकेच्या हवामान खात्याने जुलैअखेर येणाऱ्या ‘एल-निनो’च्या संकटाची जाणीव करून दिली आहे, तरी गतवर्षी झालेल्या झालेल्या अतिरिक्त पर्जन्यमानामुळे भरलेली धरणे, जल साठे आणि जमिनीतील ओलावा त्याचप्रमाणे ‘एल-निनो’चा प्रकोप होण्याच्या अगोदर म्हणजे जून, जुलैमध्ये सर्वसाधारण पर्ज्यन्यवृष्टी होणे अपेक्षित आहे.

महाराष्ट्रासह देश पातळीवर ऊस, तसेच साखर उत्पादन आणि गाळप हंगाम यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता कमी असल्याची माहिती अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर व व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी दिली.

महाराष्ट्र तसेच लगतचा कर्नाटक, गुजरात या राज्यांत गतवर्षी लांबलेला पाऊस, परतीच्या पावसामुळे विलंबाने सुरू झालेला गाळप हंगाम आणि ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर २०२२ या काळातील ढगाळ वातावरण याचा फटका सध्याच्या ऊस हंगामाला बसला.

उभ्या उसाला आवश्यक असणारा सूर्यप्रकाश न मिळण्याचा प्रतिकूल परिणाम उसाच्या वजनावर आणि त्यातील साखरेच्या प्रमाणावर झाला. परिणामी, उत्पादन घटीचा सामना साखर उद्योगाला करावा लागत आहे.

पुढील वर्षी सकारात्मक चित्र

सध्या खोडवा उसाचे प्रमाण अधिक असले तरी पुढील वर्षी सकारात्मक चित्र दिसेल, असे महासंघाच्या वतीने सांगण्यात आले. सध्याच्या हंगामातील खोडवा उसाचे प्रमाण नव्या हंगामात कमी राहणार असून, त्याचा अनुकूल परिणाम पुढील वर्षी दिसेल, असा आशावाद दांडेगावकर व नाईकनवरे यांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Protest: आंबा, काजू उत्पादकांचा मोर्चा मुंबईत रोखला, राजू शेट्टी, महादेव जानकरांची पोलिसांकडून धरपकड

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार; कापूस टिकून, मक्याचा भाव दबावातच, बाजरी आवकेचा दबाव, तूर स्थिरावली

Illegal Water Lifting: अवैध पाणी उपसा; तलावांवरील मोटारी हटविण्याचे आदेश

Lower Terna Project: निम्न तेरणा प्रकल्पाचा कारभार वाऱ्यावर

Land Acquisition: शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा निधी तातडीने द्या : मंत्री प्रकाश आबिटकर

SCROLL FOR NEXT