Sugar Production Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Sugar Production : ब्राझीलमधील साखर उत्‍पादनात वाढ कायम

Sugar Market : यंदा साखर उत्पादनात ब्राझीलचा दबदबा कायम राहण्याची शक्यता आहे. या देशात साखरेचे उत्पादन यंदा ४०० लाख टनापर्यंत जाण्याचा अंदाज आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : यंदा साखर उत्पादनात ब्राझीलचा दबदबा कायम राहण्याची शक्यता आहे. या देशात साखरेचे उत्पादन यंदा ४०० लाख टनापर्यंत जाण्याचा अंदाज आहे. सध्या ब्राझीलमधून साखर निर्यातीसाठी जहाजांची प्रतीक्षा करावी लागत आहे.

सोयाबीन, मका या पिकांबरोबर साखरेच्या उत्पादनातही वाढ झाल्याने यंदा साखर उद्योगाला साखर इतर देशांत पाठविण्यासाठी ब्राझीलच्या विविध बंदरावर जहाजे मिळण्याची वाट पहावी लागत आहे.

ब्राझीलमध्ये सोयाबीन, मका पिकाचेही उच्चांकी उत्‍पादन झाले आहे. जहाजांचे प्राधान्य या पिकांसाठी आहे. यामुळे साखर निर्यातदारांना जहाजे मिळणे मुष्‍कील झाले आहे. साखरेसाठी जहाज मिळण्याचा कालावधी (वेटिंग पिरियड) पंधरा दिवसापर्यंत होता.

तो कालावधी आता ४५ दिवसापर्यंत गेला आहे. ज्या वेगात साखर जागतिक बाजारात जाणे अपेक्षित होते. तो वेग प्रत्यक्षात मिळत नसल्याचे चित्र आहे. पण काही कालावधीनंतर जहाजे लवकर उपलब्ध होतील, अशी शक्यता असल्याचे साखर उद्योगातून सांगण्यात आले.

सध्या साखर प्रत्यक्षात निर्यात करणे अडचणीचे बनत आहे. इतर देश स्‍थानिक गरज भागविण्याइतकीही साखर निर्मिती करण्यासाठी धडपडत आहेत. यामुळे ज्या देशांतून निर्यात अपेक्षित होती, ती निर्यात यंदा होण्याची शक्‍यता कमी आहे. परिणामी यंदा ब्राझीलमधूनच सर्वीधिक साखर निर्यात होऊ शकते, अशी चिन्हे आहेत.

यंदा ब्राझीलच्या हंगामाची सुरवात सकारात्मक वातावरणात राहिली. दोन वर्षाच्या दुष्‍काळानंतर देशात यंदा साखरेचा हंगाम नव्या उत्साहात सुरू झाला. जगात इतर देश साखर उत्पादनासाठी झगडत असताना या देशात मात्र यंदा साखर उत्पादन जादा प्रमाणात होऊ लागले.

यंदा तेथे पाऊस चांगला झाला. यामुळे उसाची वाढही चांगली झाली. तेथील उसाचा हंगाम एप्रिलमध्ये सुरू झाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २० ते २५ टक्क्यांनी साखरेच्या निर्मितीत वाढ होत गेली. ऊस तोडणीच्या वेळचा काही दिवसांचा अपवाद वगळता मोठा पाऊस झाला नाही. यामुळे ऊस तोडणी फारशी व्यत्यय न येता सुरू राहिली.

ब्राझीलच राहणार साखर उत्पादनात अग्रेसर

सुरवातीला युनिका आंतराष्र्टीय संस्थेने साखर उत्पादनाचा अंदाज ३७० लाख टनांचा वर्तविला होता. कालांतराने हंगामाचा वेग पाहून संस्‍थेने हा अंदाज ४०० लाख टनापर्यंत वाढविला. सध्याचा ऊस तोडणीचा वेग पाहता ब्राझील निश्चितपणे हा टप्पा ओलांडेल, असे चित्र आहे. या तुलनेत भारत, थायलंड, चीन आदी देशांमध्ये यंदाच्या हंगामात साखर उत्पादनासाठी फारशी समाधानकारक स्‍थिती नसल्याने ब्राझीलच साखर उत्पादनात अग्रेसर राहील, अशी शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT